गेल्या दोन आठवड्यांत सिनेसृष्टीत अनेक दुःखद बातम्या येत असताना आता आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आली आहे. बांगलादेश सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हुमैरा हिमू हिचा वयाच्या ३७व्या वर्षी निधन झालं. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. हुमैरा काही दिवसांपूर्वी आजारी होती. मात्र, त्या दिवशी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर तिला बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Bangladeshi Actress Humaira Himu Death)
दरम्यान, तिच्या मृत्यूचे कारण समोर आले नसले. तरी याबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, रुग्णालय प्रशासनाला अभिनेत्रीच्या मानेवर एक अस्पष्ट खून दिसली. त्यानंतर त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. अभिनेत्रीचा मृत्यू झाल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन आलेले मित्र पोलिस येण्याच्या आतच फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
हे देखील वाचा – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गौतम हलदर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विद्या बालनच्या चित्रपटाचं केलं होतं दिग्दर्शन
तसेच, पोलिसांनी असंही म्हटलं आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून हुमैराचे एका व्यक्तींसह अफेअर सुरु होते. मात्र, त्यावेळी दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाले. ज्यामुळे ती आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करत होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांना ठोस पुरावा अदयाप मिळालेला नसून पोस्टमार्टम रिपोर्टनंतर सर्व सत्य बाहेर येणार आहे.
हे देखील वाचा – Video : प्रसाद जवादे व अमृता देशमुखच्या लग्नापूर्वीच्या तयारीला सुरुवात, डान्स रिहर्सल करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
हुमैरा हिमूने २००६ मध्ये रंगभूमीतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. “छायाबिती” या मालिकेद्वारे तिने टीव्ही विश्वात प्रवेश केला, ज्यातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर, ‘बारी बारी सारी’, ‘हाऊसफुल’, ‘गुलशन अव्हेन्यू’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही ती झळकली आहे. तर मोर्शेदुल इस्लाम दिग्दर्शित ‘अमर बंधू रशीद’ या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. हुमैरा हिमूच्या अचानक निधनाने तिच्या कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.