मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या लग्नाची सध्या जोरदार सुरु आहे. प्रसाद व अमृताने ‘बिग बॉस’ मराठीचे चौथे पर्व चांगलंच गाजवलं होतं. दोघांनी त्यांच्या खेळीने व मैत्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या कार्यक्रमानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालं. त्यांनतर काही महिन्यात त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. येत्या १८ नोव्हेंबरला ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून लग्नापूर्वीच्या तयारींना नुकतीच सुरुवात झाली आहे. (Prasad Jawade and Amruta Deshmukh Wedding dance reharsals video)
एकीकडे दोन्ही कुटुंबियांच्या घरी लग्नाची लगबग सुरु असताना हे दोघं त्यांचं लग्न अविस्मरणीय राहावं, यासाठी अथक प्रयत्न करत आहे. प्रसाद व अमृता या लग्नसोहळ्यात खास डान्स परफॉर्म करताना दिसणार असून त्या रिहर्सल्सचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर या डान्स रिहर्सलचे काही व्हिडीओ शेअर केले. ज्यामध्ये ही जोडी त्यांच्या कोरिओग्राफरसह डान्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – “बायको हे प्रकरण खूप…”, प्रसाद ओकने शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर कलाकारांच्या कमेंट्सचा पाऊस, बायको म्हणते, “तुझ्या बोलण्यामध्ये…”
तसेच या व्हिडीओज मध्ये ही जोडी सुंदर दिसत असून दोघांचं उत्तम बॉण्डिंग पाहायला मिळत असल्याचं दिसतं. अमृताने नुकतेच या डान्स रिहर्सलचे तीन व्हिडीओ शेअर केले. पहिल्या व्हिडिओमध्ये प्रसाद व अमृता शाहरुख खानच्या एका गाण्यावर एकत्र थिरकताना दिसत आहे. तर दुसरा एका व्हिडीओमध्ये प्रसादची डान्स रिहर्सलनंतर झालेली अवस्था पाहायला मिळते. ज्यात ती प्रसादला उद्देशून म्हणते, “जेव्हा तुम्ही वयाच्या तिशीनंतर लग्न करता…”. शेवटच्या व्हिडीओमध्ये अमृता लावणी सादर करताना दिसत असून त्या व्हिडिओला तिने “वैयक्तिक प्रेक्षक प्रसाद २४ तास तुमच्याबरोबर असला की…”, असं कॅप्शन दिलं आहे. या जोडीच्या डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहते यावर भरभरून प्रेम व्यक्त करत आहे.
हे देखील वाचा – Aarti Solanki : “तीन अफेअर्स होते पण…”; आरती सोळंकीचा लव्ह लाईफबद्दल खुलासा, म्हणाली, “एक इंडस्ट्रीमधीलच मुलगा होता पण…”
‘बिग बॉस मराठी’च्या घरातच अमृता व प्रसादची पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर घरात दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले, काही प्रेमळ भांडणंही झाले. पण याच घरात दोघांमध्ये मैत्रीचे सूर जुळले. दोघांची या घरातील मिश्किल मैत्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडली होती. पुढे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडताच दोघांची मैत्री अधिक खुलत गेली. त्यानंतर या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा संपन्न झाला होता. तसेच दोघांचा केळवणही झालं. नुकताच या जोडीने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या नवीन घराची झलक चाहत्यांना दाखवली होती, त्याची जोरदार चर्चा झाली होती.