‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. केदार शिंदे दिगदर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या १०० कोटीच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने आतापर्यंत ७५ कोटींचा पल्ला गाठला आहे प्रेक्षकांचं मन जिंकतंच बॉलीवूड मध्ये देखील या चित्रपटाची हवा आहे. बॉलीवूडमधील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.(sonali bendre on baipan bhari deva)
पाहा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाविषयी अभिनेत्री सोनाली बेंद्रे काय म्हणाली?
सोनाली बेंद्रेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “खरंच बाईपण लय भारी आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. congratulations Team ” शिवाय व्हिडिओत सोनाली बेंद्रे म्हणतेय की, “माझ्याबरोबर तुम्ही ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची स्टारकास्ट पाहत आहात. तसेच केदार सर ही आहेत. ५० दिवस झाले तरीही ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटगृहात ठाण मांडून बसला आहे. अजिबात कुठेही हलायचं नाव घेत नाही. श्रावण सुरू होतोय मंगळागौरीचा चित्रपट आहे. माझ्या मते, फक्त हा चित्रपट महिलांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा चित्रपटगृहात जाऊन पाहणं गरजेचं आहे. मग कोणाची वाट पाहताय, चित्रपटगृहात जा.”
हे देखील वाचा:- ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर गरोदर, नवऱ्याला लिप किस करत दिली आनंदाची बातमी, अभिनेत्रीचा बदलला लूक
सोनाली बेंद्रेच्या या पोस्टवर केदार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हंटलंय कि, “मी आधीच पाच वेळा हा चित्रपट पाहिला आहे आणि अजूनही पाहायचा आहे. मला वंदना गुप्ते आणि दीपा परब याचं काम खूप आवडलं.” अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मोडून काढत आहे. या चित्रपटाने एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. महिलांबरोबरच आता पुरुष मंडळी देखील हा चित्रपट थेट सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत.
हे देखील वाचा:- ‘ताली’ वेबसीरिजमध्ये तृतीयपंथीयांच्या वेशात सुव्रत जोशीला पाहिल्यानंतर बायकोची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “तुझ्याबरोबर राहूनसुद्धा…”
सहा बहिणींभोवती फिरणार या चित्रपटाच्या कथानकाच्या साऱ्यांच्या मनावर राज्य केलं. जगभरातील महिला प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे.’बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर केदार शिंदे आता कोणता नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.