शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बाहुबली’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याकडून हॉटेलची तोडफोड अन् नुकसान, परिवारातील अन्य सदस्यांवरही गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 13, 2025 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Baahubali fame actor Rana Daggubati and his family members against case filled for hotel damage

हॉटेलची तोडफोड व नुकसान केल्याप्रकरणी ‘बाहुबली’ चित्रपट फेम राणा दग्गुबतीवर गुन्हा दाखल

‘बाहुबली’ या चित्रपटातील भल्लालदेव या भूमिकेने जगात लोकप्रियता मिळवलेला अभिनेता राणा दग्गुबतीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे, राणा दग्गुबती, अभिनेता व्यंकटेश आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद पोलिसांनी रविवारी दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेश, याशिवाय व्यंकटेश यांचा भाऊ अन् निर्माता सुरेश दग्गुबती, सुरेश यांचा मुलगा व अभिनेता राणा दग्गुबती याशिवाय दग्गुबती परिवारातील आणखी काही सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र हे नेमकं काय आहे? ज्यामुळे अभिनेता अडचणीत आला आहे, जाणून घेऊया… (rana daggubati case filled)

हैदराबाद येथील फिल्म नगर भागात डेक्कन हॉटेलविषयी हे प्रकरण आहे. दग्गुबाती कुटुंबाने फिल्म नगर येथे त्यांची जमीन नंद कुमार या व्यक्तीला भाड्याने दिली होती. नंद कुमार हा एक व्यावसायिक असून तो त्या जागेवर ‘डेक्कन किचन’ नावाचं हॉटेल चालवत होता. काही दिवसांपूर्वी नंदकुमार आणि दग्गुबती कुटुंब यांचे संपत्तीबद्दल मोठे वाद झाले. त्यामुळे कायदेशीर कारवाईही झाली. त्यानंतर नंद कुमारने दग्गुबती परिवारावर आरोप केला की, दग्गुबती परिवाराने चोरी केली. याशिवाय ज्युबली हिल्समधील प्रॉपर्टीचं नुकसानही केलं.

View this post on Instagram

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati)

आणखी वाचा – ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर टिकू तलसानियांची तब्येत कशी? लेकीने दिली मोठी माहिती, म्हणाली, “माझे पप्पा…”

दिवाणी न्यायालय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाचं दग्गुबती कुटुंबाने उल्लंघन केल्याचा आरोप त्याने केला आहे. दग्गुबती परिवाराने अवैधपणे प्रवेश करुन असामाजिक तत्त्वांची मदत घेऊन प्रॉपर्टीचं नुकसान केलं, असं नंद कुमारचं म्हणणं आहे.  नामपल्ली कोर्टाने शनिवारी पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आणि या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम सोढीची तब्येत आणखीनच खालावली, अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाली, “माझी बहीण वारली तेव्हा…”

त्यानुसार, पोलिसांनी ४४८, ४५२,४५८ आणि १२०बी या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणी अभिनेता व त्याच्या कुटुंबियांवर पुढे काय कार्यवाही होणार? हे लवकरच पाहायला मिळेल. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. राणा-व्यंकटेश आणि दग्गुबती परिवारातील इतर सदस्यांची यामुळे चौकशी होण्याची शक्यता आहे.

Tags: baahubali fame actor rana daggubatirana daggubati case filledrana daggubati case filled for hotel damage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amitabh Bachchan Ruin Mukesh Khanna 

"कॉपी करतो", अमिताभ बच्चन यांनीच मुकेश खन्नांचं उद्धवस्त केलं करिअर?, शक्तीमानवर नक्कल केल्याचा आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.