‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटातील कमाल धाम सगळ्यांनाच आठवत असेल. या चित्रपटातील धमाल विनोद आजही सर्वांच्या लक्षात असतील. त्यातील महत्त्वपूर्ण भूमिका केलेल्या आरती छाबरियाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. २००१ साली ‘लज्जा’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतरही तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण काही काळानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब झालेली पाहायला मिळाली. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांनी नेहमी संवाद साधत असते. आता तिच्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली असून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. (actress aarti chabria pregnancy )
चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्यानंतर तिने तिच्या खासगी आयुष्याकडे लक्ष देण्याचे ठरवले. आरतीने २३ जून २०१९ रोजी विशारद बीडासीबरोबर लग्न केले होते. विशारद हा ऑस्ट्रेलियामध्ये चार्टर्ड अकाऊंटट म्हणून काम करत आहे. लग्नाच्या पांच वर्षानंतर आरती व विशारद यांना मूल होणार आहे. दोन दिवस आधी आरतीने इन्स्टाग्रामवर मॅटर्निनिटी व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये आरतीने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला असून पोटावर हात ठेवला आहे. तसेच फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप व निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तीने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओवर तिच्या मित्रमंडळी व नेटकऱ्यांनी त्यांच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पाच वर्षांपूर्वी आरती व विशारदने घरातील मंडळींच्या उपस्थितीमध्ये खासगी पद्धतीने लग्न केले. विशारद हा ऑस्ट्रेलियातील एका कंपनीमध्ये चार्टर्ड अकाऊंट म्हणून काम करत आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच आरती आई होणार आहे. आरती व विशारद यांचे अरेंज मॅरेज झाले होते.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१३ साली पंजाबी चित्रपट ‘व्याह ७० कीमी’ या चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. त्याआधी तिने ‘आवारा पागल दिवाना’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘शादी नंबर १’ या चित्रपटांमध्ये दिसली होती.