कलाकाराचा सन्मान हा त्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणिय भाग असतो. आपण मेहनतीने सादर केलेल्या कलेला प्रेक्षकांच्या प्रतिसाद सोबतच मनाचे पुरस्कार मिळणं हे देखील कलाकारासाठी तेवढच प्रेरणादायी ठरत.असाच एक मनाचा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे पार्श्वगायिका आशा भोसले यांना. (Asha Bhosle)
महाराष्ट्र भूषण हा मनाचा पुरस्कार आशा भोसले यांना प्रधान करण्यात आला. आशा भोसले यांना संपूर्ण महाराष्ट्र आशा ताई म्हणून संबोधतो.आशा ताईंना हा पुरस्कार जाहीर होताच महाराष्ट्र भरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या गायनाचे चाहते तसेच मनोरंजन विश्वातील अनेक गायक, पार्श्वगायक, अभिनेते, अभिनेत्री यांनी सुद्धा आशा भोसले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर गायक अवधूत गुप्ते याने आशा ताईंसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
अवधूत ने त्याच्या ऑफिशीयल इंस्टाग्राम अकाउंट वरून फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिलं आहे ‘गायन आणि पार्श्वगायन ह्यातील फरक ज्यांनी दाखवला व शिकवला.. पडद्यामागील आवाज हा पडद्यावरील चेहऱ्याचे सौंदर्य किती पटीने वाढवू शकतो, हे ज्यांनी वारंवार सिद्ध केले.. ज्यांचे प्रत्येक गीत हे पार्श्वगायकासाठी एक पाठ्यपुस्तक आहे.. प्रत्येक सादरीकरण हा प्रयोग आहे.. ज्यांचा जीवनप्रवास एक तपस्या आहे आणि कारकीर्द हा आदर्श आहे.. अशा, आशा भोसले नावाच्या ह्या विद्यापीठास #महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल संपूर्ण पार्श्वगायक परिवारातर्फे मी शासनाचे मनःपूर्वक आभार मानतो. आशाताई, चरणस्पर्श करुन हार्दिक अभिनंदन!!'(Asha Bhosle)
====
हे देखील वाचा – ‘अशोक मामांना आपलं नाव माहित असणं…’ पृथ्वीकची अशोक सराफ यांच्यासाठी भावनिक पोस्ट
====
पोस्ट मध्ये अवधूत ने आशा भोसले यांना पार्श्वसंगीतातील विद्यापीठ संबोधत आशा ताईंचे गीत हे एका पार्श्वगायकासाठी एखाद पाठपुस्तक आहे असं म्हणलं आहे. तसेच या पोस्ट मध्ये अवधूत ने सांगितलेल्या प्रमाणे पडद्यामागील आवाज हा पडद्यावरच्या कलाकाराचं सौन्द्र किती वाढवू शकतो हे प्रमाण देत आशा ताई यांच्या कलेचा सन्मान कलेला दिसून येतो. आशा भोसले यांच्या गायकीचा व्यासंग पाहता, प्रेक्षकांचं त्यांच्या आवाजावर असलेलं प्रेम पाहता मानाच्या पुरस्कारांपैकी एक असलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना मिळणं या बद्दल कुणाच्याही मनात चकूनही शंका येणार नाही एवढं नक्की.