शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आजही सोनू निगमच्या पाया पडतो”, अवधूत गुप्तेचा खुलासा, म्हणाला, “एकदा एखाद्याला…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 18, 2024 | 11:31 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Avadhoot Gupte talked about why he touch Sonu Nigam's feet and salutation see the details

"आजही सोनू निगमच्या पाया पडतो", अवधूत गुप्तेचा खुलासा, म्हणाला, "एकदा एखाद्याला..."

दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, गायक, परिक्षक आणि निर्माता अशा अनेक विविधांगी भूमिकांमध्ये दिसणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे अवधूत गुप्ते. आज यशाच्या शिखरावर असणारा अवधूत एकेकाळी संगीत विश्वात स्टगल करत होता. मराठी इंडस्ट्रीत ओळख कमावण्यापूर्वी त्याने एका हिंदी रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ‘सा रे ग म प’, ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमांमध्ये अवधूतने परिक्षकाची भूमिका बजावली होती.

पण तुम्हाला माहीत आहे का ‘सारेगमप हिंदी’मध्ये अवधूत स्पर्धक म्हणूनही सहभागी झाला होता. १९९६ साली पार पडलेल्या या शोचा विजेताही अवधूत गुप्ते ठरला होता. त्यावेळी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याकडे होती. तेव्हा ते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असूनही गायक अवधूत गुप्ते हे सोनू निगमच्या पाया पडायचे. स्वत: अवधूत यांनी याबद्दल खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Avadhoot???? Gupte???? (@avadhoot_gupte)

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असणार खास, तर ‘या’ राशीच्या लोकांची होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या…

नुकत्याच मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले आहे. यावेळी अवधूत गुप्ते यांनी असं म्हटलं की, “सोनू निगम हे तेव्हा अँकर (सूत्रसंचालक) होते. तेव्हा मी त्यांना नमस्कार करायचो. तसं मी आजही त्यांच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार करतो. मला वयामधलं अंतर महत्त्वाचे वाटत नाही. हे तेव्हापासून निश्चित झालं आहे”.

यापुढे अवधूत यांनी गमंतीत असं म्हटलं की, “एकदा एखाद्याला बाप म्हटलं की बापचं म्हणावं लागतं. काही काळानंतर नाही आता मी तुझा बाप आहे असं नाही करता येत ना.” दरम्यान, अवधूत गुप्ते यांनी आजवर त्यांच्या अनेक गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध तर केलंच आहे. पण त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाद्वारेदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’चा शेवटचा भाग अन् मंचावर भावूक झाला कुशल बद्रिके, पोस्ट शेअर करत म्हणाला, “चूकभूल…”

दरम्यान, अवधूत यांनी ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘एक तारा’ तसेच ‘कान्हा’सारख्या चित्रपटातून महाराष्ट्रातील सण-समारंभ व राजकारणावर भाष्य केले आहे. संगीतकार आणि गायक म्हणून त्याने मराठी संगीत विश्वाला एकापेक्षा एक सरस गाणी दिली. त्याच्या अनेक रॉकिंग अल्बमनी तरुणाईला अक्षरश: वेड लावले होते. शिवाय त्याने सिनेदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही जबाबदारी निभावली.

Tags: avadhoot gupteentertainment newsMarathi newssonu nigam
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Mukesh Khanna on Ranveer Singh

"न्यूड सीन करणाऱ्यांना…", रणवीर सिंह शक्तीमानची भूमिका साकारण्यावरुन भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, "दुसऱ्या देशात जा आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.