मनोरंजन विश्वात सध्या आघाडीची मालिका म्हणजे आई कुठे काय करते नव्या विषयासह छोट्या पडद्यावर अवतरलेली मालिका दीर्घ काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. मालिकेतील अरुंधती या पात्रा भोवती फिरताना दिसतंय. एका लग्नानंतर महिलांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे का नाही या घटनांवर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.अनिरुद्ध सोबत मोडलेल्या लग्नानंतर अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोष हा नवीन साथीदार म्हणून आला. आता काहीही संबंध नसताना देखील अनिरुद्धला अरुंधती आणि आशुतोषच हे प्रेम मान्य नाही.(Aai Kuthe Kay Karte update)
अरुंधती आणि आशुतोषचा लग्नसोहळा अनेक अडचणींचा सामना करूनही थाटात पार पडला. आधी विरोध करण्यांपैकी कांचन आईनी अखेर आपलं मत बदलून अरुंधतीच कन्यादान करण्यास पुढाकार घेतला. आणि लागण लावून आनंदात अरुन्दठीची पाठवणी देखील केली.
मालिकेच्या पुढच्या भागात संजना अनिरुद्ध पुढे संजना आशुतोष आणि अरुंधतीचा विषय काढते आणि अनिरुद्धचा राग अनावर होतो तुला एवढाच पुळका आहे तर तू ही त्यांच्या कडे जाऊन राहा असं अनिरुद्ध संजना सुनावतो.
====
हे देखील वाचा- ‘कोणी तरी काजळाची तिट लावा ‘ मुलीच्या लग्नात अभिनेते उपेंद्र लिमये भाऊक
====
तर आता अरुंधतीच्या लग्नामुळे संजना आणि अनिरुद्धच्या नात्यामध्ये फूट पडणार का? मूल आणि आप्पा अरुंधतीशिवाय कसे राहणार हे मालिकेच्या येणाऱ्या कथानकात उलगडेल.तर एकीकडे अरुंधतीच ह्या नव्या घरी उत्साहाचं वातावरण दिसत आहे. सगळे जण अरुन्दतेसाठी आणलेले गिफ्ट्स अरुंधतीला देतात. तर सगळे अरुंधतीचा निरोप घेताना भावुक झाल्याचं दिसतात.
मूल आईच्या आठवणीने भावुक होऊन रडताना दिसतात. तर मालिकांच्या येणाऱ्या भागात अनिरुद्ध अजूनही अरुंधतीपुढे नवीन संकट आणणार का आणि आशुतोष यामधून बाहेर निघण्यासाठी अरुंधतीचा कसा आधार बनेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.(Aai Kuthe Kay Karte update)