बुधवार, जून 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नाटक सुरु असताना फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकावर आस्ताद काळे भडकला; प्रयोग थांबवून म्हणाला, “इथे येऊन अभिनय करा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 17, 2026 | 3:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Astad Kale Angry On Audience

फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकावर आस्ताद काळे भडकला

Astad Kale Angry On Audience : मनोरंजनासाठी आज प्रेक्षकांकडे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. चित्रपटगृहातील सिनेमा, टीव्ही मालिका, ओटीटीवरील वेबसीरिज आणि रंगमंचावरील नाटक. यापैकी नाटक हा एकमेव असा प्रकार आहे, जो प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष सादर केला जातो. त्यामुळे कलाकारांकडून होणारी प्रत्येक कृती, संवाद आणि भावना त्या क्षणीच अनुभवली जाते. मात्र यासाठी सभागृहात पूर्ण शांतता आणि प्रेक्षकांची शिस्त तितकीच आवश्यक असते.

अलीकडेच अशाच शिस्तभंगाच्या घटनेमुळे एक नाट्यप्रयोग काही काळ थांबवावा लागला. आस्ताद काळे सध्या ‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकात काम करत आहेत. प्रयोग रंगात आलेला असतानाच प्रेक्षकांपैकी एका व्यक्तीचा मोबाईल फोन वाजला आणि त्या व्यक्तीने तो उचलून मोठ्याने बोलायला सुरुवात केली. फोनवरील संभाषणाचा आवाज रंगमंचापर्यंत पोहोचत असल्याने कलाकारांची एकाग्रता भंग होत होती. अखेर परिस्थिती असह्य झाल्यानंतर आस्ताद काळे यांनी नाटक मधेच थांबवले आणि स्टेजवरूनच त्या प्रेक्षकाला सुनावले. “आम्ही तुमच्या घरी येऊन फोनवर बोलू, तुम्ही इथे येऊन नाटक करा,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा – “खूप लाजिरवाणी गोष्ट आहे”, ऑस्कर २०२६ मध्ये धर्मेंद्रकडे दुर्लक्ष, हेमा मालिनीचा संताप, ईशा देओल म्हणाली…

मात्र काही क्षणांनंतर त्यांनी स्वतःला सावरत प्रेक्षकांची माफीही मागितली. कलाकाराची व्यावसायिकता आणि प्रेक्षकांबद्दलचा आदर यामुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे सांगितले जाते. नाटक सुरू होण्यापूर्वी आवश्यक सूचना देण्यात आल्या तरीही घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वातावरण गंभीर झालं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रंगमंचावरील शिस्त आणि प्रेक्षकांची जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या १० वर्षांनी सुप्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपं होणार आई-बाबा?, डोहाळजेवणाची तयारी सुरु असल्याच्या चर्चा, उत्सुकता वाढली

Tags: Astad Kale Angry On Audiencemarathi actormarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Nikhil Chavan And Anushka Sarkate Wedding
Entertainment

Photo : अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची लगीनघाई, सहकलाकारांकडून केळवण साजरं, सोशल मीडियावर चर्चा

जून 10, 2026 | 10:34 am
mangesh desai the maharashtra files
Entertainment

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, १२ जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात

जून 9, 2026 | 10:59 am
Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
Next Post
Niranjan Kulkarni With His Wife Gudipadwa Special

निरंजन कुलकर्णीच्या लग्नाच्या तारखेचे गुपित समोर, जूनमध्ये नाहीतर 'या' महिन्यात पार पडलंय लग्न ; म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.