गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, १२ जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2026 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
mangesh desai the maharashtra files

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, १२ जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात

mangesh desai the maharashtra files : सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि समाजातील दुर्बल घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी मांडणारा आगामी मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ अखेर १२ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. शासन दरबारी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि वंचित समाजाच्या वेदना यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून वास्तवाचा आरसा ठरणार आहे. बंजारा समाजाच्या न्याय, हक्कांसाठी दाखविण्यात येणारी ही भारतातील पहिली फिल्म आहे.

मात्र या चित्रपटाचा प्रवास सोपा नव्हता. विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला आणि या काळात निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सेन्सॉर बोर्डाने केलेल्या विलंबामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबल. एक मराठी निर्माता म्हणून या विलंबाचा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याची भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेत निर्माते आणि चित्रपटातील कलाकार मंडळींनी या विलंबाबाबत आपली मतं मांडली. यावेळी निर्माते संजीव कुमार राठोड, क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते शालिनी राठोड, अभिनेते मंगेश देसाई यांची उपस्थिती होती.

आणखी वाचा – लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

एकूणच या प्रकरणाबाबत बोलताना निर्माते संजीव कुमार राठोड म्हणाले, “हा चित्रपट समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्हालाही मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अडथळे आणि सेन्सॉर बोर्डाच्या विलंबाचा सामना करून अखेर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आहोत. सत्य मांडण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.”

आणखी वाचा – घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशय यामुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे. अनेक अडचणींवर मात करत आता हा चित्रपट १२ जून रोजी राज्यभर प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे संपूर्ण टीमचे लक्ष लागले आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Nikhil Chavan And Anushka Sarkate Wedding

Photo : अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची लगीनघाई, सहकलाकारांकडून केळवण साजरं, सोशल मीडियावर चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.