मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निरंजन कुलकर्णीच्या लग्नाच्या तारखेचे गुपित समोर, जूनमध्ये नाहीतर ‘या’ महिन्यात पार पडलंय लग्न ; म्हणाला…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 17, 2026 | 6:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Niranjan Kulkarni With His Wife Gudipadwa Special

निरंजन कुलकर्णीच्या लग्नाच्या तारखेचे गुपित समोर

Niranjan Kulkarni With His Wife Gudipadwa Special : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गेल्या काही वर्षात सर्वात जास्त लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तसेच या मालिकेतील अशीच एक भूमिका जी प्रत्येकाला भावली. अरुंधतीच्या मोठ्या मुलाची म्हणजेच अभिषेकची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी. काही महिन्यांपूर्वीच निरंजन लग्नबंधनात अडकला. यावेळी निरांजनाच्या लग्नावरून बरीच चर्चा रंगल्या. अभिनेत्यानं शेअर केलेल्या व्हिडीओवरून निरंजन गुपचूप लग्न केलं असंही अनेकांनी म्हटलं.

आणखी वाचा : नाटक सुरु असताना फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकावर आस्ताद काळे भडकला; प्रयोग थांबवून म्हणाला, “इथे येऊन अभिनय करा…”

अखेर निरंजननं केलेल्या या गुपचूप लग्नाची तारीख समोर आली आहे. अभिनेत्यानं ‘मज्जा पिंक’ला दिलेल्या गुढीपाडवा स्पेशल मुलाखतीत या गोष्टीचा अखेर खुलासा केला आहे. यावेळी निरंजन आणि मनीषा यांच्यासह खास गप्पा रंगल्या. लग्नाच्या तारखेचा खुलासा करत निरंजन म्हणाला, “आमचं लग्न जून २०२५ मध्ये नाही झालं. ही अफवा आहे. खरंतर आमचं लग्न ९ मे ला झालं आहे. अनेकांना असं वाटलं की मी गुपचूप किंवा पळून जाऊन लग्न केलं. पण तसं काही नाही. आम्हाला मर्यादित लोकांमध्ये आणि डेस्टिनेशन लग्न करायचं होतं. आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो होतो. तिथे छान समुद्र होता आणि मी तेव्हा इच्छा व्यक्त केली की आमचं लग्न अशाच छान ठिकाणी व्हावं. त्यानंतर मनीषा आणि मी मोरजीम मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.” (Niranjan Kulkarni With His Wife Gudipadwa Special)

View this post on Instagram

A post shared by MAJJA PINK (@majjapink)

तर पुढे निरंजन म्हणाला, “सुरुवातीला मी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी मनीषाच्या चेहरा दाखवला नव्हता. तेव्हा इतर लोकांना असं वाटलं की माझा नवीन चित्रपट किंवा अल्बम येत असावा. त्यावरून मला सगळे शुभेच्छा देत होते. अशी सगळी गम्मत त्यावेळी घडली.” (Niranjan Kulkarni With His Wife Gudipadwa Special)

आणखी वाचा : “खूप लाजिरवाणी गोष्ट आहे”, ऑस्कर २०२६ मध्ये धर्मेंद्रकडे दुर्लक्ष, हेमा मालिनीचा संताप, ईशा देओल म्हणाली…

Tags: niranjan kulkarniNiranjan Kulkarni WeddingNiranjan Kulkarni With His Wife Gudipadwa Special
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Next Post
Paaru Serial Off Air

‘पारू’ मालिका अचानक बंद; अभिनेत्री शरयू सोनावणेने सांगितलं खरं कारण; म्हणाली, "निर्मात्यांकडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.