शुक्रवार, ऑगस्ट 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Photo : अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची लगीनघाई, सहकलाकारांकडून केळवण साजरं, सोशल मीडियावर चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2026 | 10:34 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nikhil Chavan And Anushka Sarkate Wedding

Photo : अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची लगीनघाई, सहकलाकारांकडून केळवण साजरं, सोशल मीडियावर चर्चा

Nikhil Chavan And Anushka Sarkate Wedding : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कलाकार अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच विवाहबंधनात अडकणार असलेल्या या जोडीच्या लग्नपूर्व विधींना सुरुवात झाली असून नुकतेच त्यांचे पारंपरिक केळवण पार पडले. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. थेट सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली. यापूर्वी ही जोडी कारभारी लयभारी या मालिकेत एकत्र काम करताना दिसली.

अनुष्का आणि निखिल यांच्या खास सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव आणि त्यांची पत्नी, तसेच अभिनेत्री शर्मिला शिंदे यांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. प्रेम, आपुलकी आणि पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात पार पडलेल्या या केळवण सोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत. दोघांनी यावेळी खास उखाणाही घेतल्याचं पाहायला मिळालं. केळवणासाठी निखिल आणि अनुष्काचा मराठमोळा अंदाजही लक्षवेधी ठरला.

आणखी वाचा – घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

केळवणाच्या निमित्ताने अनुष्का आणि निखिल यांच्यासाठी खास जेवणाचा बेत करण्यात आला होता. भरत जाधव आणि त्यांची पत्नी, जयराज नायर, शर्मिला शिंदे या कलाकारांनी दोघांचे प्रेमाने स्वागत करत त्यांच्या आगामी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. कलाकारांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला अधिक रंगत आली. अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांच्या शाही लग्नपत्रिकेचीही सोशल मीडियावर हवा झाली. आता त्यांच्या लग्नपूर्व कार्यक्रमांना सुरुवात झाल्याने विवाहसोहळा आता लवकरच पार पडणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही या लोकप्रिय जोडीच्या लग्नाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा – सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, १२ जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात

दरम्यान, केळवण सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून या भावी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Tags: Anushka SarkateNikhil Chavanwedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
Arjun Rampal interview

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.