divyanka tripathi pregnant : लोकप्रिय टीव्ही कपल दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या घरात लवकरच आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. दिव्यांका त्रिपाठी प्रेग्नंट असून तिचा बेबी शॉवर सोहळाही लवकरच होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, अद्याप या जोडप्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसून, दोघांच्या कुटुंबात जल्लोषाचे वातावरण असल्याचे वृत्त आहे. दिव्यांका आणि विवेकही या नव्या फेजचा गुपचूप आनंद घेत आहेत आणि एकत्र वेळ घालवत आहेत. अशी माहिती आहे की दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांचे २०१६ मध्ये लग्न झाले होते आणि आता १० वर्षानंतर ते त्यांच्या पहिल्या मुलाचे पालक होणार आहेत. दिव्यांका सध्या ४१ वर्षांची असून ती आई होण्यासाठी खूप उत्सुक आहे.
आमच्या सहयोगी ‘ETimes’ च्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांचे कुटुंबीय आनंदात आहेत आणि त्यांनी मुलाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु केली आहे. दिव्यांका आणि विवेक यांनी त्यांच्या आयुष्यातील हा सुंदर क्षण आत्तापर्यंत गुपित ठेवला होता, तर त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले की ते त्यांच्या कुटुंबासोबत या प्रसंगाचा आनंद घेत आहेत लवकरच दिव्यांका त्रिपाठीचा बेबी शॉवर सोहळाही आयोजित केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कपलचे कुटुंब आणि नातेवाईकांशिवाय जवळचे मित्र आणि टीव्ही स्टार्सही यात सहभागी होणार आहेत. लग्नाच्या दोन वर्षानंतर दिव्यांका आणि विवेक दहिया पालक होणार असल्याच्या बातम्या आलेल्या पाहायला मिळाल्या.
A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)
२०२० मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये विवेक दहिया व्यायाम करताना दिसत होते, परंतु व्हिडीओमध्ये एका लहान मुलाचे शूज देखील दिसले होते. कॅमेऱ्याचे फोकस वारंवार बुटांवर जात होते, त्यामुळे विवेक दहिया लवकरच पिता होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, त्याने आणि दिव्यांकाने प्रेग्नेंसीच्या बातम्यांचे खंडन केले होते. नंतर विवेक दहियाने ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, “मला समजत नाही की आमच्यासोबत असे का होत आहे. ही गोष्ट इंटरनेटवर वारंवार येते. पण नाही, आम्ही गर्भवती नाही. जेव्हा हे घडेल तेव्हा आम्ही चाहत्यांना नक्कीच सांगू. याचे उत्तर आमच्याकडे नाही. देवाकडे उत्तर आहे, त्याला विचारा. होईल तेव्हा कळेल. ते उघड होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”.
आणखी वाचा – जन्नत जुबेर आणि तिच्या भावावर हल्ला, दिवसाढवळ्या पनवेल हायवेवर घडली घटना, दोघांची तब्येत आता नेमकी कशी?
याआधी २०१८ मध्येही दिव्यांका त्रिपाठीच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या आल्या होत्या, ज्या दीर्घकाळ टिकल्या होत्या. त्यानंतर कंटाळलेली अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘माझ्याकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे आणि माझे मौन त्या अफवेला संमती म्हणून घेतले गेले आहे. पण जसजसे तुम्ही मोठे होतात तसतसे तुम्ही या अफवांकडेही दुर्लक्ष करता. हा असा भाग आहे की तो कसा सुरु झाला आणि कोणी सुरु केला हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे याला जबाबदार असणारे लोक ओळखणे अवघड आहे. मला आशा आहे की लोक काही जबाबदारी दाखवतील. पण आता मला काही फरक पडत नाही”.





