Sankarshan Karhade Singapore Tour with Familyअष्टपैलू कलाकारांमध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच नाव आवर्जून घेतलं जातं.संकर्षण अभिनेता म्हणून जितका प्रसिद्ध आहे तितकंच लेखक म्हणून देखील संकर्षणच कौतुक होतं. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांना जितकं प्रेम मिळालं तितकंच प्रेम संकर्षणाच्या समीर या भूमिकेला देखील मिळालं.(Sankarshan Karhade Singapore Tour with Family)
मालिकेच्या माध्यमातून संकर्षण घराघरात पोहचला असला तरी, रंगभूमीवर देखील सध्या तो उत्तम काम करताना पाहायला मिळत आहे.’तू म्हणशील तस’,’नियम व अटी लागू’ या संकर्षणच्या नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतं आहे. अभिनेत्री अमृता देशमुख सोबत संकर्षणच ‘नियम व अटी लागू’ हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरु आहे. या नाटकाचे अनेक हाऊसफुल्ल प्रयोग पार पडताना पाहायला मिळतं आहेत.याचं नाटकाचा सध्या सिंगापूर दौरा सुरु सुरु आहे.
संकर्षणच्या मुलांचा पहिला परदेश दौरा (Sankarshan Karhade Singapore Tour with Family)
संकर्षणे सिंगापूर दौऱ्यामधील, त्याच्या मुलांचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये त्याने म्हंटले आहे, “सर्वज्ञ , स्रग्वी चा पहिला परदेश दौरा “नियम व अटी लागू” नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने”.सर्वज्ञ व स्रग्वी या व्हिडिओमध्ये त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्याचा आनंद घेताना पाहायला मिळतं आहे. संकर्षण त्याच्या सोशल मीडियावरून मुलांसोबतचे अनेक फोटोज, व्हिडिओज शेअर करत असतो.
हे देखील वाचा : शूटिंगमधून ब्रेक घेत धनश्री काडगांवकर करतेय लेकासह धमाल-मस्ती, व्हिडीओने वेधलं चाहत्यांचं लक्ष
सर्वज्ञ व स्रग्वी नावाची संकर्षणाला दोन जुळी मुलं आहेत.संकर्षण वेगवेगळ्या कारणांमुळे देखील चर्चेत असतो काही दिवसांपूर्वी संकर्षणे नाटकाच्या प्रोयगावरून परताना स्वतः नाटकाची बस चालवली होती. तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. परिस्थितीच जे भान संकर्षणे राखलं त्याबाबत अनेकांनी त्याचं कौतुक देखील केल.(sankarshan karhade viral video)