वडिलांच्या निधनाला कुठे होते अशोक सराफ ?

Ashok Saraf Hard Memory
Ashok Saraf Hard Memory

काही कलाकार असे असतात ज्यांनी वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणीचं व्यावसायिक आयुष्यात कधीही भांडवल केलेलं नसत. अशात एक नाव अग्रस्थानी आहे ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. परिपूर्ण हा शब्द अशोक मामांना अगदी साजेसा आहे. अशोक मामांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या कारकिर्दीबद्दल, आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या किस्स्यांबद्दल बोलावं तितकं कमीच. अशोक सराफ हे बहुगुणी व्यक्तिमत्व आहे. आयुष्यातील पाच दशक सिनेविश्वात काम करणाऱ्या या अभिनेत्याने खाजगी आयुष्यातील कारण कधीच हाताळली नाहीत. प्रत्येक संकटाना धिटाण सामोर जात, अशोक मामांनी आपलं जीवन अधिक सुरळीत केलं. (Ashok Saraf Hard Memory)

असाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेले अनेक किस्से त्यांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. १९७५ साली अशोक मामा यांचं ‘डार्लिंग-डार्लिंग’ हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला एक किस्सा मामांनी सांगितला आहे. ‘डार्लिंग-डार्लिंग’ या नाटकादरम्यान मामा एका चित्रपटाचं चित्रीकरण ही करत होते. याबद्दल बोलताना ते म्हणाले, दहा दिवसांत दररोज फक्त तीन तासांची झोप घेऊन काम केले आणि अकराव्या दिवशी तापाने फणफणलो. १०२ ताप. ‘अंगाला स्पर्श केल्यावर चटका बसतोय,’ असं राजा गोसावी म्हणत होते; तरीही मी आठ प्रयोग केले. काम करताना ताप जायचा आणि काम संपल्यावर पुन्हा यायचा. मामांची कामपूर्तीची निष्ठा या किस्स्यातून जाणवतेच आहे, मात्र त्यांचा कामाबद्दलचा आदर हा आणखी एका किस्स्यातून प्रखरतेने जाणवतोय.

मामांनी सांगितला तो भावुक किस्सा (Ashok Saraf Hard Memory)

एक कलावंत म्हणून काम करत असताना मामांनी त्यांचं काम, त्यांची कामाप्रतीची निष्ठा प्रचंड जपली. हे सगळं बोलण्यामागचं कारण म्हणजे, आपल्या वडिलांच्या निधनावेळी ही ते आले नाहीत. या कठीण प्रसंगाबद्दल सांगताना मामा म्हणाले, एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी राज्याबाहेर असताना वडिलांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याचं धाकट्या भावानं कळवलं. चित्रीकरण झालं नाही, तर निर्मात्याचं खूप मोठे नुकसान होणार असल्यानं ते करणं भाग पडलं. आणि त्याचवेळी एका क्षणी वडील गेल्याची वार्ता आली, त्यांच्या आयुष्यातील हा भावुक प्रसंग हृदय हेलावणारा आहे. (Ashok Saraf Hard Memory)

हे देखील वाचा – फक्त लक्षा, अशोकच नाही तर या कलाकारांशिवाय सुद्धा पूर्ण नव्हते कोठारेंचे चित्रपट, पहा कोण आहेत ते कलाकार

मी बहुरूपी या पुस्तकात अशोक मामा आणि त्यांचे वडील यांचं खूप घट्ट नातं होत, याबाबत निवेदिता सराफ यांनी सांगितलं आहे. शुटिंगवरून परतल्यावर वडिलांसोबत ते विशेष वेळ घालवत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Queen of 80s faced worst things
Read More

शूटिंगदरम्यान जबरदस्ती केल्याने ‘या’ अभिनेत्रीने ठोकला सिनेविश्वाला रामराम

या घटनेनंतर अचानक अर्चना रुपेरी पडद्यावरून गायब झाली. करियरच्या टर्निंग पॉइंटवर असतानाच अर्चनाने लग्नाचा निर्णय घेतला आणि ती थेट अमेरिकेत स्थायिक झाली.
Mahesh Kothare Nilima Kothare
Read More

“खबरदार पुन्हा असं काही बोलशील तर!” महेश कोठारेंना दिली पत्नीने धमकी

पहिली माझी आई जेनमा आणि दुसरी माझी पत्नी नीलिमा! नीलिमा यांनी पत्नी म्हणून महेश यांची प्रत्येक काळात साथ दिली.
Dattu More Wedding News
Read More

‘म्हणून दत्तूने खाल्ला समीरचा ओरडा’ पाहा दत्तू ने लग्नाची बातमी सांगितल्यावर काय होत्या हास्य जत्रेतील मित्रांच्या रिअक्शन

अनेक कलाकार नेहमी चर्चेत असतात त्यांच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे. सध्या असाच एक चर्चेचा विषय आहे तो…
Ashok saraf Sulochana Latkar
Read More

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केले सुलोचना लाटकर कुटुंबियांचे सांत्वन

सुलोचना लाटकर यांच्या अंत्यदर्शनाला अभिनेते सचिन पिळगांकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ तसेच राजकीय क्षेत्रातून मनसे अध्यक्ष
Dattu Mores Honeymoon
Read More

पहा दत्तू मोरे चाललाय या ठिकाणी हनिमूनला

लग्न संभारंभ, प्री वेडिंग फोटोशूट उरकल्यानंतर आता दत्तू त्याच्या बायकोला घेऊन कुठे हनिमूनला जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.