रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐश्वर्या नारकर यांच्या पारंपरिक मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष, आहे फारच युनिक, काळ्या मण्यांमध्ये कमी प्रमाणात सोन्याचा वापर अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2024 | 12:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar Mangalsutra

ऐश्वर्या नारकर यांच्या पारंपरिक मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष, आहे फारच युनिक, काळ्या मण्यांमध्ये कमी प्रमाणात सोन्याचा वापर अन्…

सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच एक मराठमोळी लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली आहे. तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा नुकताच शाही विवाहसोहळा संपन्न झाला. तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या लग्नामधील लूकची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. तितीक्षा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांनाही तितीक्षाने लग्नाला निमंत्रित केलं होत. दरम्यान, या मालिकेतील काही कलाकारांनी तितीक्षाच्या लग्नाला हजेरी लावलेली पाहायला मिळाली. (Aishwarya Narkar Mangalsutra)

तितीक्षाच्या लग्नाला सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील ऐश्वर्या नारकर, एकता डांगर, सुरुची अडारकर या कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ऐश्वर्या नारकर यांचा यावेळचा पारंपरिक लूक साऱ्यांना विशेष भावला. आजवर ऐश्वर्या यांनी त्यांच्या अभिनयाने व सौंदर्याने साऱ्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अशातच मैत्रिणीच्या लग्नासाठी जाताना ऐश्वर्या यांनी केलेला खास लूक साऱ्यांना अधिक भावला.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानंतर अशोक सराफ ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित, देवकी पंडीत व ऋतुजा बागवे यांचाही गौरव

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ऐश्वर्या यांच्या या पारंपरिक लूकमधील लक्षवेधी बाब म्हणजे त्यांचं मंगळसूत्र. एकसरी असलेलं काळ्या मण्यांचं व त्याला मुहूर्तमन्यांचं पेंडंट असलेलं पहायला मिळत आहे. लांबसडक असं हे पारंपरिक मंगळसूत्र खूप खास आहे. यावेळी ऐश्वर्या यांनी काठापदराची साडी नेसली होती, शिवाय नाकात नथ घालत त्यांचा मराठमोळा लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला. तर त्यांच्या गळ्यातील पारंपरिक मंगळसूत्राने त्यांच्या सौंदर्यात आणखी भर घातली.

आणखी वाचा – Video : धमाकेदार एन्ट्री घेत तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा भन्नाट डान्स, साध्या लूकमध्ये दिसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांच्यासह ट्रेंडिंग रील करत शेअरदेखील करतात. हे दोघेही सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. ऐश्वर्या व अविनाश यांनी आपापल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ऐश्वर्या यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या सौंदर्याचं विशेष कौतुक होतं. ऐश्वर्या या स्वतःच्या फिटनेसबाबतही विशेष काळजी घेताना दिसतात.

Tags: Aishwaraya Narkaraishwarya narkar lookAishwarya Narkar Mangalsutraentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Vicky Kaushal on Katrina Kaif

आता एकमेकांचं जमेना! लग्नाच्या दोन वर्षांनंतर विकी कौशलने कतरिनाबरोबरच्या नात्याबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाला, "आता पहिल्यासारखं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.