आपल्या बहारदार अभिनयाने नाटकाचे रंगमंच, चित्रपट व टीव्हीची स्क्रीन अन् बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेला भारावून टाकणारे अभिनेते म्हणजे म्हणजे अशोक सराफ. आपल्या विनोदी अभिनयाने कधी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू तर कधी आशयघन भूमिका साकारत डोळ्यात टचकन पाणी आणणारे अभिनेते म्हणून त्यांची ख्याती आहे. अशातच मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर सर्वच स्तरातून अशोक सराफ यांचं कौतुक होताना पाहायला मिळालं. मुंबईतील वरळे येथे हा दिमाखदार सोशला आयोजित करण्यात अलया होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
हा पुरस्कार सोहळा स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी त्याचे मनोगत व्यक्त करताना असं म्हटलं की, “महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुरस्कार मला प्रदान केलात याचा मला खरोखर आनंद होत आहे. ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, जी माझी कर्मभूमी आहे अशा पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं. याशिवाय दुसरी आनंदाची गोष्ट कोणती नाही. यानिमित्ताने मी महाराष्ट्र शासनाचे मन:पूर्वक आभार मानतो की त्यांनी मला या पदाला नेऊन बसवलं. कारण ज्या लोकांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशा मोठ्या लोकांमध्ये मला त्यांची बसवलं याचा मला अधिक आनंद आहे”.
यापुढे अशोक सराफ यांनी भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “माझ्यासह काम करणाऱ्या लोकांनी मला सतत पाठिंबा दर्शवला म्हणून इथपर्यंत पोहोचलो. महाराष्ट्रातला प्रेक्षक हा बुद्धिमान व अतिशय खडूस प्रेक्षक आहे. कारण त्यांना आवडलं तर आवडलं नाहीतर नाही. अशा लोकांसमोर काम करण ही तारेवरची कसरत असते. त्यांना आवडलं तर ते निश्चित डोक्यावर घेतील, पण तुम्ही त्यांच्या समोर काहीही सादर करू शकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना काय आवडेल याच नेहमी भान ठेवावं लागत. तसेच यानिमित्ताने समस्त प्रेक्षक वर्गाचे आभार मानतो. प्रेक्षकांचे हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. पण माझ्या हृदयात तुम्ही दिलेलं प्रेम सतत राहील”.
अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’सारख्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणे, हे त्यांनी आजवर केलेल्या कामाची खूप मोठी पोचपावती असं म्हणणं वावगं ठरणार नाही. दरम्यान, अशोक सराफ यांच्या या सर्वोच्च सन्मानामुळे कलाकार मंडळी, राजकीय नेते इतकंच नव्हे तर समस्त प्रेक्षकवर्गाकडून अशोक सराफ यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.