Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage : कलाकारांच्या लगीनघाईत अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांचं लग्न विशेष चर्चेत राहील. काल स्वानंदी व आशिष ही जोडी विवाहबंधनात अडकली. अगदी पारंपरिक अंदाजात व शाही थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा संपन्न झाला. दोघांच्या लग्नातील लूकचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘आयुष्यभराची आनंदी साथ’ असं म्हणत स्वानंदीनं लग्नाचे फोटो शेअर केलेत. स्वानंदी व आशिषने फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वानंदी व आशिष यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांच्या विवाहसोहळ्यात खास क्षणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळाले. स्वानंदी व आशिष यांनी त्यांच्या लग्नात धमाल केलेली पाहायला मिळत आहे. नुकताच आशिषचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आशिषने या व्हिडीओमध्ये स्वानंदीची गाणं गायलेलं दिसत आहे.
आशिषने थेट लग्नबंधनात स्वानंदीसाठी गाणं गायलेलं पाहायला मिळत आहे. भर लग्नमंडपात आशिषने स्वानंदीसाठी ‘जानू मेरी जान, मैं तेरे कुर्बान’ हे गाणं गायलं आहे. आशिष गाणं गाताना स्वानंदी त्या गाण्यावर थिरकलेली पाहायला मिळत आहे. अगदी धमाल मस्ती करत त्यांनी त्यांचं लग्न एन्जॉय केलेलं पाहायला मिळत आहे. लग्नसोहळ्यातील त्यांचा लूकही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोघांनी लग्नासाठी केलेल्या पैठणी लूकची प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
स्वानंदी व आशिष यांच्या लग्नसोहळ्याप्रमाणेच मेहंदी व संगीत सोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवाय लग्नापूर्वीच्या विधींचे फोटोही या जोडीने पोस्ट केले होते. त्यांच्या संगीत सोहळ्यातील डान्स व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळाला. लेकीच्या लग्नात उदय टिकेकर व त्यांच्या पत्नीनेही डान्स केला. शिवाय सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीही स्वानंदी-आशिषच्या लग्नात, संगीत सोहळ्यात थिरकताना दिसले.