Mere Husband Ki Biwi Set Falls Down : सिनेसृष्टीतून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाच्या सेटवर एक गंभीर अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये भूमी पेडणेकर, अर्जुन कपूर आणि जॅकी भगनानी थोडक्यात बचावले. रॉयल पाम्स येथे असलेल्या इम्पीरियल पॅलेसमध्ये चित्रपटाचा सेट बांधण्यात आला होता आणि तेथे अचानक छत कोसळले आणि खाली पडले. त्यावेळी अर्जुन, भूमी पेडणेकर आणि जॅकी भगनानी यांच्याशिवाय दिग्दर्शक मुदस्सर अझीझ तिथे उपस्थित होते. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सर्वजण सुरक्षित आहेत.
ETimes शी बोलताना, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे अशोक दुबे म्हणाले की, “शूटिंग दरम्यान साउंड सिस्टममुळे कंपन झाल्यामुळे ही घटना घडली”. अशोक दुबे म्हणाले, “रॉयल पाम्सच्या इम्पीरियल पॅलेसमध्ये गाण्याचे शूटिंग सुरु असताना लोकेशनचे छत कोसळले, ज्यामध्ये अर्जुन कपूर, जॅकी भगनानी आणि मुदस्सर अजीज जखमी झाले. हे स्थान बरेच दिवसांपासून असल्याने साऊंड सिस्टीमच्या कंपनामुळे सेट हादरू लागला, त्यामुळे छत कोसळले”. दरम्यान, या गाण्यावर अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्याबरोबर काम करणारे कोरिओग्राफर विजय गांगुली यांनी शूटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
आणखी वाचा – अंकिता लोखंडेच्या सासूला हवाय नातू, थेट टेलिव्हिजनवर लेकाकडून व सूनेकडून केली नातवंडाची मागणी
तो म्हणाला, “आम्ही एका गाण्याचे शूटिंग करत होतो आणि पहिला दिवस चांगला गेला. दुसऱ्या दिवशी, आम्ही शॉट्स घेत असताना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. अचानक छत कोसळले तेव्हा आम्ही मॉनिटरवर होतो. सुदैवाने, त्याचे तुकडे झाले, त्यामुळे आमच्याकडे खड्ड्यासारखी जागा होती जिथे आम्ही लपलो आणि स्वतःला वाचवले, पण तरीही अनेकांना दुखापत झाली”. विजय गांगुली पुढे म्हणाले, “ही जुनी ठिकाणे अजूनही शूटिंगसाठी वापरली जातात आणि एक प्रोडक्शन कंपनी असल्याने आम्ही सर्व सुरक्षा उपाय तपासले आहेत याची खात्री करतो. मात्र अनेक वेळा शूटिंगसाठी लोकेशन देण्यापूर्वी त्या ठिकाणाची नीट तपासणी केली जात नाही”. या अपघातात दिग्दर्शक जखमी झाल्याचे विजय गांगुली यांनी सांगितले.
आणखी वाचा – अमिताभ बच्चन व ऐश्वर्या रायबरोबरच्या तुलनेबाबत अभिषेक बच्चन स्पष्टच बोलला, लेक आराध्याकडून आहेत ‘या’ अपेक्षा
डीओपी मनु आनंदचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता आणि विजय गांगुलीच्या कोपर आणि डोक्याला दुखापत झाली होती. कॅमेरा अटेंडंटच्या मणक्यालाही दुखापत झाली. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे कोणीही गंभीर जखमी झाले नाही. FWICE ने आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि BMC यांना पत्र लिहून सुरक्षा मानकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय त्यांनी अग्निशमन विभागालाही याबाबत माहिती दिली आहे. FWICE च्या म्हणण्यानुसार, अग्निशमन विभागाने माहिती दिली की चित्रकूटमधील संरचनेसाठी केवळ ९० दिवसांची परवानगी देण्यात आली होती, परंतु ती अद्यापही कायम आहे.