Abhishek Bachchan On Comparison : अभिषेक बच्चन गेल्या २५ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. एका सुपरस्टारचा मुलगा असल्याने या अभिनेत्याची अनेकदा वडील अमिताभ बच्चन यांच्याशी तर कधी पत्नीशी तुलना केली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने कुटुंबाशी तुलना करण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. याशिवाय त्याने मुलगी आराध्या बच्चनबद्दलही काहीतरी भाष्य केले आहे. जेव्हा अभिषेक बच्चनला CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आले की त्याच्या कुटुंबाचे यश आणि यशाचा त्याच्यावर परिणाम होतो का, तेव्हा अभिनेत्याने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला, “हा प्रश्न गेल्या २५ वर्षांपासून विचारला जात आहे आणि आता मी त्यापासून मुक्त झालो आहे. जर तुम्ही माझी तुलना माझ्या वडिलांशी करत असाल तर तुम्ही माझी तुलना सर्वोत्तम व्यक्तींबरोबर करत आहात. जर तुम्ही माझी तुलना सर्वोत्कृष्टांशी करत असाल तर कुठेतरी मला असे वाटते की कदाचित मी या महान नावांमध्ये गणला जाण्यास पात्र आहे”.
अभिषेक पुढे म्हणाला, “मी हे सर्व कसे पाहतो. माझे आई-वडील माझे आई-वडील आहेत. माझे कुटुंब माझे कुटुंब आहे आणि माझी पत्नी माझी पत्नी आहे. आणि मला त्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांनी केलेल्या कामाचा खूप अभिमान आहे”. वडील अमिताभ बच्चन यांच्यासाठी अभिनेता पुढे म्हणाला, “आम्ही मुंबईत एसी रुममध्ये बसून कॉफी पीत आहोत. तिथे एक ८२ वर्षीय व्यक्ती सकाळी ७ वाजल्यापासून केबीसीसाठी शूटिंग करत आहे. तो एक आदर्श घालून देत आहे. मलाही असे व्हायचे आहे. रात्री झोपताना मला हेच वाटतं आणि हवं असतं”. अभिनेत्याने त्याच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी पुढे सांगितले की तो धार्मिकपेक्षा अधिक आध्यात्मिक आहे.
आणखी वाचा – लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे अपघाती निधन, ऑडिशनसाठी जात असताना ट्रकने चिरडलं अन्…; कुटुंबियांवर शोककळा
तो म्हणाला, “आज मी जो काही आहे तो माझ्या कुटुंबामुळे आहे. मी जे काही करतो ते माझ्या कुटुंबासाठी करतो. त्याचे मत माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मला माझ्या आजोबांनी दिलेल्या माझ्या नावाचा खूप अभिमान आहे. पण त्यांनी आम्हाला दिलेल्या आडनावाचा मला अधिक अभिमान आहे आणि त्यांच्या आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत. आजोबांमुळे मिळालेले प्रेम पुढे चालू ठेवण्यासाठी मी काम करेन. मला आशा आहे की माझी मुलगी आणि येणाऱ्या पिढ्या याचा आदर करतील आणि त्यांचाही असाच विचार असेल”.