Ankita Lokhande Mother In Law Wants Grandchildren : ‘लाफ्टर शेफ’ हा लोकप्रिय शो कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या शोचा नवा सीझन २५ जानेवारीला दर शनिवार आणि रविवारी रात्री ९:३० वाजता प्रसारित होणार हे. पण त्याआधी या शोचे सर्व एपिसोड शूट होत आहेत. ज्याचे प्रोमो हळूहळू प्रदर्शित करत आहेत. अशातच लेटेस्ट प्रोमोमध्ये अंकिता लोखंडेची सासू आणि आई आलेली दिसत आहेत. यादरम्यान शोमध्येच विकीच्या आईने मूल होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अंकिता व विकीच्या लग्नाला अनेक वर्ष झाली असून त्यांनी अजून बाळाचं प्लॅनिंग केलेलं नाही. त्यामुळे हे दोघे केव्हा गुडन्यूज देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तर आता कुटुंबीयही अंकिता व विकीच्या बाळाच्या गुडन्यूजकडे डोळे लावून बसले आहेत.
‘लाफ्टर शेफ’च्या नवीन प्रोमोमध्ये अंकिता लोखंडेची सासू भारतीला म्हणते, “मी शोमध्ये हिऱ्यासारखा मुलगा आणि सोन्यासारख्या सूनेला सोडायला आले आहे”. तेव्हा अंकिताची आई म्हणते, “यामध्येही मी त्यांचे एकमेकांवरील खूप प्रेम पाहिले आहे”. तेव्हा सासू म्हणते, “पण त्यांनी अजून प्रेमाचं गिफ्ट दिलं नाही यार, हे तुम्ही काय केलंत?”. हे ऐकून विकी जैनला धक्का बसतो आणि अंकिता लाजताना दिसतेय.
आणखी वाचा – नवरी नटली! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, कुटुंबियांबरोबर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल
भारती तिच्या हाताने गर्भधारणेचे संकेत देत विकी जैनला विचारते, “तुझे धैर्य कोणी तोडले, मला सांग. तू करु शकतोस भाऊ”. त्याचवेळी अंकिता सुद्धा गमतीत तिचा पदर पसरुन विकीला म्हणते, “किती दिवस मी अशी वाट पाहत बसली आहे बेबी”. यावर विकी हसत म्हणतो, “हे असं झोळीत टाकलं जात नाही. हे कुणीतरी हिला समजावून सांगा. त्यामुळेच आपण यशस्वी होत नाही आहोत”, असंही तो गमतीत बोलतो. हे ऐकून सगळे हसतात.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. एकजण म्हणाला, “अरे, या दोघांना आणलं तर अली, अर्जुन, करण आणि निया का नाही”. तर एकजण म्हणाला, “करण, अली आणि निया पण यायला हवेत”. रीम शेखने ‘फिल्म ज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, दुसऱ्या सीझनसाठी निर्मात्यांनी तिच्याशी संपर्क साधला नाही. कारण तसे केले असते तर ती नक्कीच आली असती कारण तिला हा शो खूप आवडतो आणि पुन्हा पुन्हा करायला आवडेल.