Archana Puran Singh : बॉलिवूड सिनेसृष्टीत जेव्हा केव्हा अर्चना पूरण सिंहचा विषय निघतो तेव्हा तिच्या जोरात हसण्याबरोबरच तिच्या मड आयलंड येथील बंगल्याचीही बरीच चर्चा होते. कपिल शर्मा आपल्या शोमध्ये अर्चनाला तिच्या मड आयलंड बंगल्याबद्दल बरेचदा टोमणे मारताना दिसला आहे. पण अर्चना आणि परमीत सेठी यांनी मड आयलंड बंगला कसा विकत घेतला आणि बांधला हे फार कमी जणांना ठाऊक असेल. याबाबतचा खुलासा अर्चनाने स्वतः केला आहे. या बंगल्यासाठी परमीतने गंमतीत तिला घटस्फोटाची धमकी दिल्याचा खुलासाही केला आहे. अर्चना पूरण सिंह यांनी अलीकडेच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये याबद्दल बोलली. अर्चनाने सांगितले की, तिचा पती परमीतला अपार्टमेंटमध्ये राहण्याची सवय आहे, तर अर्चना डेहराडूनमध्ये एका बंगल्यात राहायची.
अर्चनाच्या म्हणण्यानुसार, छोट्या शहरांमध्ये मोठी घरे आहेत. त्यामुळे तिने परमीतला सांगितले की, तुला बंगला घ्यायचा असेल तर तीन खोल्या असलेला बंगला नाही तर किमान सात खोल्या असाव्यात असा बंगला घे”. भारती अर्चनाला म्हणाली, “मला अजूनही आठवते जेव्हा ‘कॉमेडी सर्कस’ची पार्टी असायची तेव्हा अर्चना मॅडम तिला तिच्या घरी बोलवायची. एवढा मोठा बंगला आणि एवढी मोठी बाग. मला वाटायचे की टीव्हीवाले आणि फिल्मी लोक सगळेच श्रीमंत आहेत. आम्हीही घेऊ. पण असा बंगला घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते म्हणून आम्ही फ्लॅट घेतला आहे”.
हे ऐकून अर्चना म्हणाली, “मला तो बंगला तेव्हा खूप स्वस्तात मिळाला म्हणून घेतला”. तेव्हा परमीत म्हणाला, “मला एक बंगला घ्यायचा होता आणि हिला दोन बंगले घ्यायचे होते”. तेव्हा अर्चना म्हणाली, “तो मुंबईमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहायचा आणि मी डेहराडूनमध्ये एका बंगल्यात राहायची. लहान शहरांमध्ये मोठी घरे आहेत. तर मी म्हणाले, बघ तीन खोल्या असलेला बंगला नाही. सहा-सात खोल्या असल्याशिवाय बंगला मोठा कसा होणार?. यावर ते म्हणाले की, “तुला एक बंगला घ्यायचा असेल तर मी परवानगी देत आहे. जर दोन बंगले घ्यायचे असतील तर आमचा घटस्फोट होईल”.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या भावाची लगीनघाई, शेअर केले लग्न ठरल्यानंतरचे फोटो, शुभेच्छांचा वर्षाव
हा किस्सा सांगत अर्चना म्हणाली, “मी म्हणाले आहे की आता घटस्फोट झाला पाहिजे, काहीही झाले तरी मी घेत आहे. तेव्हा परमीत म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, घेऊया”. परमीत सेठी म्हणाले की, “मी मड आयलँड बंगला खरेदी करण्याच्या विरोधात आहे. पण नंतर त्यांनी होकार दिला आणि त्यांच्या इच्छेनुसार बंगला पुन्हा बांधला”. अर्चनाने सांगितले की, तिने हा बंगला हॉलिडे होम म्हणून घेतला होता. ती व परमीत एका फ्लॅटमध्ये राहत होते. पण त्याला तिथलं दृश्य इतकं सुंदर वाटलं की तो मड बेटावर कायमचा राहायला गेला. आजच्या तारखेनुसार या बंगल्याची किंमत ४५ कोटी रुपये इतकी आहे”.