मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत रेश्मा शिंदे, किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर, शाल्व किंजवडेकर आणि नुकतीच हेमल इंगळे या कलाकारांनी अलीकडेच आपल्य जोडीदराबरोबर लग्नगाठ बांधली. लवकरच शिवानी सोनार व अंबर गणपुले ही जोडीही विवाहबंधनात अडकणार आहे. अशातच आता गायिका कार्तिकी गायकवाडच्या घरीसुद्धा लगीनघाईला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडचा भाऊ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आणि त्याच्याच लग्नाची लगबग सुरु झाली आहे. त्याचं लग्न ठरल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (kartiki gaikwad brother engagement)
गायिका कार्तिकी गायकवाडने भाऊ कौस्तुभ व त्याची होणारी पत्नी यांचा खास फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने या दोघांचा खास फोटो शेअर करत लग्न ठरल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “मनापासून शुभेच्छा कौस्तुभ व काव्या” असं म्हणत तिने या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच कार्तिकी गायकवाडकचा नवरा रोनित पिसेनेही त्यांचा फोटो शेअर केला आहे आणि “जमलंय” असं म्हणत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. कौस्तुभ व काव्या यांचा कुंकुम तिलक कार्यक्रम नुकताच पार पडला असून आता लवकरच कौस्तुभ विवाहबंधनात अडकणार आहे.

आणखी वाचा – 08 January Horoscope : वृषभ व मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस खास, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
कौस्तुभनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर “Officially engaged! We’re engaged. Yes to forever” असं म्हणत होणाऱ्या बायकोबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. याशिवाय कार्तिकी गायकवाडने सुद्धा कौस्तुभसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ गायकवाड सुद्धा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. काही चित्रपटांसाठी त्याने पार्श्वगायन केलेलं आहे.
आणखी वाचा – अंकिता वालावलकर होणाऱ्या नवऱ्यासह योगिता चव्हाणच्या भेटीला, फोटो शेअर करत म्हणाली, “दोन अतिविचारी मुली…”
कार्तिकी, तिचे वडील व भाऊ मिळून गाण्यांचे अनेक शोज देखील करतात. ‘बॉईज’ चित्रपटातलं ‘लग्नाळू’ हे गाणं त्याने गायलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं आणि आजही या गाण्याची चर्चा होताना दिसते. याशिवाय त्याने अनेक भक्तीगीत व अभंग गायली आहेत. अशातच आता हा गायक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.