कलाकार मंडळी हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळत असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना एका ढोल ताशा पथकाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. दरवर्षी महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकींचा वेगळाच थाट अनुभवायला मिळतो. विशेषतः पुण्यात मराठी कलाकारही ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देतात. असेच एक कलाकारांचे ढोल ताशा पथक ‘कलावंत पथक’. काही दिवसांपासून पुण्यातील हे ढोल-ताशा पथक एका कलाकारांच्या एक्झिटमुळे चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. (Saurabh Gokhale On Kalawant Dhol Tasha Pathak)
अभिनेता आस्ताद काळेने हे पथक सोडल्यानंतर याची मोठी चर्चा झाली होती. आता कलावंत पथकाचा पथक प्रमुख अभिनेता सौरभ गोखलेने एका मुलाखतीत यावर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी सौरभने ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी अभिनेत्याने कलावंत ढोल-ताशा पथकातील वादाबद्दल भाष्य केलं. यावेळी बोलताना सौरभ म्हणाला, “वाद असा नाही. आपण कुठलाही आपण ग्रुप घेतला तर त्याच्यात मतभेद होत असतात. थोडेसे वाद असतातच. तसंच काहीसे मतभेद आमच्यातही झालं”.
आणखी वाचा – लेकाला सोडून भारतात परतताना निवेदिता व अशोक सराफ भावुक, म्हणाल्या, “सर्वात कठीण गोष्ट…”
पुढे तो असंही म्हणाला, “आम्हाला एक गोष्ट योग्य नाही वाटली, त्याला काही गोष्टी योग्य वाटल्या नाहीत. फक्त त्याने जो निर्णय घेतला तो त्याला योग्य वाटत असला तरी आम्हाला टोकाचा वाटला. कुठलीही गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणून ती सोडणं हा उपाय असू शकत नाही. पण ठीक आहे, तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही त्याचा आदर केला. दुर्देवाने ती सोशल मीडियावर आली आणि त्याची चर्चा झाली. पण, आम्ही कोणीच त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, कारण आम्हाला माहित आहे की ती अंतर्गत गोष्ट आहे”.
आस्ताद काळेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलावंत पथक सोडल्याचे सांगितले होते. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत, ““मी कलावंत पथक सोडलं आहे. या पथकाशी, त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुकांसंबंधी मला संपर्क करु नये”, असं आस्तादने स्पष्ट केलं.