Ar Rahman Son Ameen Reacts : एआर रहमान पत्नी सायरा बानोबरोबर घटस्फोटाची घोषणा केल्यामुळे चर्चेत आहेत. ए आर रहमानच्या घोषणेनंतर काही तासांनंतर त्यांच्या टीम मेंबर मोहिनी डे यांनीही पतीपासून वेगळे होण्याची घोषणा केली. मोहिनी डेमुळे एआर रहमान पत्नी सायरापासून वेगळे झाले आहेत, असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात होते. आता एआर रहमान यांचा मुलगा अमीन याने यावर प्रतिक्रिया देत थेट भाष्य केलं आहे. अफेअरच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना त्याने सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये एआर रहमान आणि मोहिनी डे यांच्या घटस्फोटाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटलं आहे. याचबरोबर अमीनने एक लांबलचक नोट लिहीत त्याचं मत मांडलं आहे.
अमीन यांनी पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “माझे वडील केवळ त्यांच्या अतुलनीय योगदानासाठीच नव्हे तर त्यांनी वर्षानुवर्षे कमावलेल्या मूल्य, आदर आणि प्रेमासाठी एक आख्यायिका आहेत. त्यांच्याबद्दल खोट्या व निराधार अफवा पसरवल्या जात आहेत हे पाहून निराशा होत आहे. एखाद्याच्या जीवनाबद्दल व वारशाबद्दल बोलताना सत्य व आदराचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे”. त्यांनी पुढे लिहिले की, “कृपया अशी चुकीची माहिती पसरवणे किंवा त्याचा भाग बनणे टाळा. त्यांच्या प्रतिष्ठेबरोबरच त्यांचा आपल्यावर असलेला प्रभाव आपणही जपू या”.
आणखी वाचा – ‘शाका लाका बूम बूम’ फेम संजू अडकला लग्नबंधनात, थाटामाटात केला विवाह, व्हिडीओ व फोटो व्हायरल
याआधी एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या वकील वंदना शाह यांनीही रेहमान आणि मोहिनी डे यांच्या घटस्फोटात कोणताही संबंध असल्याचं नाकारलं होतं. वंदना शाह यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला सांगितले होते की, “दोघांमध्ये कोणताही संबंध नाही. सायरा व मिस्टर रहमान यांनी स्वतः हा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये काही संबंध नाही”. ए. आर. रहमान यांच्या तिन्ही मुलांनी पालकांच्या विभक्त होण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं.
ए. आर. रहमान आणि सायरा बानो यांचे १९९५ मध्ये लग्न झाले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगी रहिमाने तिच्या वडिलांनी शेअर केलेलीचे पोस्ट शेअर करत “तुमच्या प्रार्थनेत आम्हाला लक्षात ठेवा” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर तमिळमध्ये लिहिलेला एक संदेशही शेअर केला, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि लोकांना असेही सांगण्यात आले की, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे.