सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ही सरकारी फाईल आहे, 10 जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही”, ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे दमदार संवाद लक्षवेधी, कधी प्रदर्शित होणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 21, 2026 | 9:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
The Maharashtra Files Trailer

“ही सरकारी फाईल आहे, 10 जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही”, ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे दमदार संवाद लक्षवेधी, कधी प्रदर्शित होणार?

The Maharashtra Files Trailer : “ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठीच्या संघर्षाचे वास्तव चित्र उलगडणारा हा चित्रपट २९ मे २०२६ पासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आजकाल बरेचजण सरकारी यंत्रणांवर बोट दाखवतात, तर काहिजण याच सरकारी यंत्रणेच्या चुका लपवतात, त्यांना घाबरतात अशांना प्रेरित करणारा असा हा ट्रेलर असल्याचं स्पष्ट दिसतंय आणि म्हणूनच चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी दाखविण्यात आलेली ही भारतातील पहिली फिल्म आहे.

ट्रेलरमध्ये न्यायासाठी झुंज देणाऱ्या एका स्त्रीची व्यथा, व्यवस्थेतील दडपशाही, तसेच संघर्षामागचं सत्य प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी असून हा चित्रपट सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा ठरणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. कागदाच्या ढिगाऱ्यांत लपलेलं सत्य येत्या २९ मे २०२६ पासून हा मोठ्या पडद्यावर उलगडेल. ‘द महाराष्ट्र फाईल्स’ची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने बाजू पाहिली.,

आणखी वाचा – कॅन्सरशी लढताना सुप्रसिद्ध अभिनेत्री काय खाते?, आहारा’बद्दल सांगत म्हणाली, “हेल्दी फूड…”

या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. येत्या २९ मे रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi movieThe Maharashtra FilesThe Maharashtra Files trailer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Tumbadachi Manjula Trailer

रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका, ‘तुंबाडची मंजुळा’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित, कलाकारांचा दमदार अभिनय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.