प्रत्येक महिलेची पहिली आवड म्हणजे साडी. पाचवार साडी, सहावार साडी, नऊवारी साडी असे अनेक साड्यांचे प्रकार असलेले बघायला मिळतात. तसेच अनेक पैठणी, काठपदर, कांजीवरम, बनारसी, जॉर्जेट असे अनेक साड्यांचे प्रकार बघायला मिळतात. आता सर्वत्र लगीनघाई सुरु आहे. त्यामुळे लग्नात कोणती साडी नेसावी? कोणत्या साडीची निवड करावी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र आता ही दुविधा दूर होणार आहे. आपण आता सुंदर आशा सिल्क पैठणी, कांजीवरम, बनारसी चांगल्या आणि बजेटमध्ये कुठे मिळतील? याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तसेच या साड्यांबद्दलदेखील सविस्तर माहिती जाणून घेऊया. (Pure Silk Paithani saree in Budget)
परवडतील अशा साड्या घ्यायल सगळ्याच महिलांना आवडतात. मात्र सर्वत्रच तशा बाजारात उपलब्ध होतीलच असे नाही. त्यामुळे आता आशा साड्यांबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. प्युअर सिल्क साड्या कितीही घेतल्या तरी त्या कमीच असतात. विशेष करून प्युअर सिल्क अस्सल पैठणी किंवा कांजीवरम किंवा बनारसी या काही ठराविक साड्या आपल्या कपाटात असाव्या असं प्रत्येकीला वाटतं. पण अनेकदा त्याची किंमत खूप असते किंवा आशा साड्या खरेदी करताना अनेकदा फसवणूक होते. पण या साड्या कमी किंमतीत मिळाल्या तर? यासाठी तुम्हाला दादर येथील हिंदमाता येथे जावं लागेल. दादर येथे ‘दिव्या फॅशन’ हे दुकान साड्यांसाठी अधिक प्रसिद्ध आहे.
‘दिव्या फॅशन’ या दुकानात ओरिजनल, हातमागाच्या आणि उत्तम क्वालिटीच्या साड्या उपलब्ध होतील. सुंदर नक्षीकाम असणारे, तसेच हातमागावरील साड्यांची किंमत ३००० रुपयांपासून सुरुवात होते. या साड्या अगदी २० ते २५ हजार रुपयांपर्यंत मिळतील. तसेच साड्यांमध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशनदेखील बघायला मिळेल.
त्यामुळे तुम्हाला जर सुंदर आणि परवडतील अशा साड्या घ्यायच्या असतील तर या दुकानामध्ये जाऊन तुम्ही खरेदी करु शकता. अस्सल साड्या स्वस्तात खरेदी करायच्या असतील तर दिव्या फॅशन, मस्तानी मंजिल, रणजीत स्टुडिओच्या जवळ, दादासाहेब फाळके रोड, हिंदमाता, दादर (पूर्व), मुंबई या पत्त्यावर जाऊन खरेदी करु शकता