Priya Bapat On Trolling : अभिनेत्री प्रिया बापट हिने आजवर नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या प्रियाही नाटकांच्या निर्मितीकडे वळली असल्याचं पाहायला मिळतंय. प्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. शिवाय प्रियाच्या आवाजाचेही लाखो दिवाने चाहते आहेत. प्रिया बापट व उमेश कामत ही जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. सोशल मीडियावरही ही जोडी बरीच सक्रिय असलेली पाहायला मिळाली आहे. प्रिया व उमेश यांच्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत.
कायमच सिनेसृष्टीत सक्रिय असणाऱ्या जोडींच्या यादी या जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. अभिनेत्रीला नेहमीच प्रेग्नन्सीबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या प्रेग्नन्सीबाबतच्या प्रश्नांवर भाष्य केलं आहे. लग्नाला १३ वर्ष होऊनही मुलबाळ नं झाल्याने बरेचदा प्रिया व उमेशला ट्रोल केलं जातं. काही काळापूर्वी प्रियाने या ट्रोलिंगला उत्तर दिलं होतं. यानंतर आता अभिनेत्रीने ‘अमुक तमुक’ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत या ट्रोलिंगवर मन मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – “इतका गर्व कुठून आला?”, करीना कपूरची चाहतीबरोबरची वागणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “अहंकार…”
यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “माझ्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत, नाही आहेत मला मुलं पण हे जे काही आहे तो निर्णय माझा आहे. उद्या जर मला वाटलं की ४२ व्या वर्षी मला मूल जन्माला घालायचंय तर मी जन्माला घालेन. हे तेव्हाही नाही वाटलं तर नाही घालणार. पण हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. लोकांची ही अपेक्षा असते की, या जोडप्याचं मूल बघायचंय. प्रत्येक जोडप्याची अपेक्षा ही मुल होणंच नाहीये ना”.
पुढे तिने असे म्हटलं की, “जोडप्याने मूल जन्माला द्यायला पाहिजे हा अधिलिखित नियमच मला पटत नाही. पण लोक आम्हाला त्यांचे आदर्श मानतात. त्यांचे आमच्यावर प्रचंड प्रेम आहे. पूर्वी मला अशा प्रश्नांचा राग यायचा पण आता मात्र मला त्यांची मानसिकता समजायला लागलीय. ते आम्हाला आपलं मानतात म्हणून त्यांच्याकडून हे प्रश्न येतात. पण मुलाला जन्माला द्यायचा की नाही किंवा कधी द्यायचा हा प्रश्न सर्वस्वी माझा आणि माझ्या नवऱ्याचा आहे”.