शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एकीकडे अप्पी-अर्जुनचे लग्न, तर दुसरीकडे अमोलची आयुष्याशी झुंज, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका निर्णायक वळणावर

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 21, 2024 | 11:31 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Appi Amchi Collector serial update new twist Appi-Arjun is going to get married and also Amol is going to have an operation

एकीकडे अप्पी-अर्जुनची जुळणार लग्नगाठ, दुसरीकडे सुटणार अमोलची साथ?, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिका निर्णायक वळणावर

झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही मालिका अमोलच्या आजारपणामुळे  नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या प्रत्येक सगळ्या इच्छा आणि हट्ट पूर्ण करत आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अमोलच्या हट्टापायी अर्जुन व अप्पी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आनंदी वातावरण होते. मात्र एकीकडे आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे अमोलच्या आजारामुळे सर्व चिंतेत आहेत. काही दिवसांपूर्वी अमोलच्या ऑपरेशनबद्दलचे कथानक पाहायला मिळाले. अशातच आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे त्याच्यावरील ऑपरेशनचा. (Appi Amchi Collector serial update)

अप्पी आमची कलेक्टर मालिकेत अमोलवर त्याला झालेल्या गंभीर आजाराची शस्त्रक्रिया होणार असून याचाच प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या नवीण प्रोमोमुळे मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. मालिकेचा हा नवीन प्रोमो खूपच भावुक असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला असून यात एकीकडे अमोलवरील शस्त्रक्रिया होतानाचे पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे अप्पी-अर्जुन यांचे लग्न होतानाचे पहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “कार्यक्रमासाठी बोलावलं अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला स्वत:च्या अपहरणाचा संपूर्ण थरार, म्हणाले, “डोक्यावर बंदूक रोखली आणि…”

या नवीन प्रोमोमधून अमोलचे ऑपरेशन व अप्पी-अर्जुन यांचे लग्न एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे अर्जुन असं म्हणतो की, “आपणच यातून मार्ग काढला पाहिजे. तो म्हणजे एकीकडे आपलं लग्न होईल आणि दुसरीकडे त्याचं ऑपरेशन. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर आणखी एका प्रोमोमध्ये अर्जुन-अप्पी यांचे लग्न होते आणि दुसरीडे अर्जुनचे ऑपरेशन होतं. यावेळी अप्पा अमोलला काही होऊ नये यासाठी डॉक्टरांना विनंती करतात. यावेळी अप्पी-अर्जुन सात फेरे घेत असताना त्यांना अमोलचा भास होतो. तेव्हा तो त्यांना “हे हात तुम्ही कधीच सोडायची नाही” असं म्हणतो.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – सूरज चव्हाणच्या नवीन घरासाठी डीपी दादा देणार फर्निचर, स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “सहा महिन्यांत…”

पण पुढे जेव्हा अर्जुन-अप्पी यांच्या लक्षात येते की, हा फक्त भास आहे. त्यानंतर दोघे धावत धावत अमोलकडे जातात. तेवढ्यात डॉक्टरही अमोलच्या ऑपरेशनमध्ये अडचणी येत असल्याचे म्हणतात. एकीकडे अप्पी-अर्जुनची जुळणार लग्नगाठ, दुसरीकडे सुटणार अमोलची साथ? असं कॅप्शन डेट हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला  आहे. त्यामुळे आता मालिकेत  पुढे काय होणार? अमोलचे हे ऑपरेशन यशस्वी पार पडणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.       

Tags: Appi Amchi Collectorappi amchi collector marathi tv serialAppi Amchi Collector Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
kangana ranaut on diljit dosanjh

कंगणा रणौतचा दिलजित दोसांझला फुल्ल सपोर्ट, दारु-सिगारेटच्या गाण्यांवर अभिनेत्री म्हणाली, "लोकांची जबाबदारी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.