झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही मालिका अमोलच्या आजारपणामुळे नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या प्रत्येक सगळ्या इच्छा आणि हट्ट पूर्ण करत आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अमोलच्या हट्टापायी अर्जुन व अप्पी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आनंदी वातावरण होते. मात्र एकीकडे आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे अमोलच्या आजारामुळे सर्व चिंतेत आहेत. काही दिवसांपूर्वी अमोलच्या ऑपरेशनबद्दलचे कथानक पाहायला मिळाले. अशातच आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे त्याच्यावरील ऑपरेशनचा. (Appi Amchi Collector serial update)
अप्पी आमची कलेक्टर मालिकेत अमोलवर त्याला झालेल्या गंभीर आजाराची शस्त्रक्रिया होणार असून याचाच प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या नवीण प्रोमोमुळे मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. मालिकेचा हा नवीन प्रोमो खूपच भावुक असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला असून यात एकीकडे अमोलवरील शस्त्रक्रिया होतानाचे पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे अप्पी-अर्जुन यांचे लग्न होतानाचे पहायला मिळत आहे.
या नवीन प्रोमोमधून अमोलचे ऑपरेशन व अप्पी-अर्जुन यांचे लग्न एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे अर्जुन असं म्हणतो की, “आपणच यातून मार्ग काढला पाहिजे. तो म्हणजे एकीकडे आपलं लग्न होईल आणि दुसरीकडे त्याचं ऑपरेशन. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर आणखी एका प्रोमोमध्ये अर्जुन-अप्पी यांचे लग्न होते आणि दुसरीडे अर्जुनचे ऑपरेशन होतं. यावेळी अप्पा अमोलला काही होऊ नये यासाठी डॉक्टरांना विनंती करतात. यावेळी अप्पी-अर्जुन सात फेरे घेत असताना त्यांना अमोलचा भास होतो. तेव्हा तो त्यांना “हे हात तुम्ही कधीच सोडायची नाही” असं म्हणतो.
आणखी वाचा – सूरज चव्हाणच्या नवीन घरासाठी डीपी दादा देणार फर्निचर, स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “सहा महिन्यांत…”
पण पुढे जेव्हा अर्जुन-अप्पी यांच्या लक्षात येते की, हा फक्त भास आहे. त्यानंतर दोघे धावत धावत अमोलकडे जातात. तेवढ्यात डॉक्टरही अमोलच्या ऑपरेशनमध्ये अडचणी येत असल्याचे म्हणतात. एकीकडे अप्पी-अर्जुनची जुळणार लग्नगाठ, दुसरीकडे सुटणार अमोलची साथ? असं कॅप्शन डेट हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार? अमोलचे हे ऑपरेशन यशस्वी पार पडणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.