‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, तिकडे अप्पीसमोर खूप मोठं आव्हान उभं असतं. काही मंडळी मोर्चा घेऊन गड किल्ल्यांवरील निर्बंध हटवण्यासाठी त्रागा करत असतात. अप्पी हवामान खात्याचा अंदाज दाखवत त्यांना हा निर्णय का घेतला हे योग्यरीत्या पटवून देते. अप्पीचं म्हणणं पटल्यानंतर मोर्चा घेऊन आलेली मंडळी तिथून निघून जातात. अशा रीतीने अप्पीने सगळ्यांची योग्यरित्या समजूत काढलेली असते. त्यामुळे अप्पीचं देखील कौतुक केलं जातं. घरी आल्यावर अर्जुनही तिचं कौतुक करतो. अर्जुन व अप्पी एकमेकांच्या जास्त जवळ येतात यामुळे आर्याला शंका येत असते. (Appi Amchi Collector Serial Update)
आर्या म्हणते मी उगीच अप्पीला त्यादिवशी जाऊन काही पण बोलले. त्या दिवसापासूनच अर्जुनच्या मनात अप्पी बद्दलच प्रेम व आदर वाढला आहे. त्याशिवाय अप्पीच्या कामाबद्दलही अर्जुनला कौतुक वाटू लागले आहे. तर चिंचुके याबाबत आर्याला सावध करतात. तर अर्जुनने घरुन अप्पीने बनवलेला डब्बा आणलेला असतो. बऱ्याच दिवसांनी मला घरुन डबा आला आहे आणि आज जेवल्यासारखं वाटलं असं अर्जुन बोलतो. हे ऐकून तर अप्पीचा अजूनच जळफळाट होतो. तर घरी आल्यानंतर सगळेजण अप्पीचं कौतुक करत असतात. त्यावेळेला दीपेश विचारतो, रूपालीताई कुठे आहेत?, त्यावर मोना सांगते की, रूपालीताई दादांबरोबर बाहेर जाणार आहे तसं सांगून गेल्या आहेत. वैयक्तिक आयुष्यात डोकावल्याने मोना दीपेशवर चिडते. तर थोड्या वेळाने दादा घरी येतात तेव्हा त्यांच्याबरोबर रूपालीताई नसतात, हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.
ते विचारतात रूपाली ताई कुठे?, त्यावर ते दादा सांगतात की, रूपाली माझ्याबरोबर नाही आणि माझं तिच्याशी काही असं बोलणंही झालं नाही की, आम्ही भेटणार होतो. काही वेळाने रूपाली घरी येते तेव्हा सगळेजण विचारतात तुम्ही कुठे गेला होतात? काय कोणालाही न सांगता?, यावर रूपाली सांगते की, मला अस्वस्थ वाटत होतं त्यामुळे मी मंदिरात गेले होते तर इकडे रूपाली जाऊन आर्याला भेटलेली असते आणि आर्याला ती सांगते की आता काही करुन आपल्याला अर्जुन व अप्पीला वेगळ करावाच लागेल. ते एकमेकांच्या जास्त जवळ जात आहेत. त्यांना वेगळं करण्यासाठी तुला आधी आमच्या घरी यावं लागेल यासाठी तुला आजारी पडाव लागेल. तेव्हा रूपालीताई तिला विचारतात, तुला कसली एलर्जी आहे का?,
त्यावर आर्या सांगते धुळीची यावर आर्या सांगते का पण, मी असं काही करणार नाही यामुळे माझा जीवही जाऊ शकतो. पण रुपाली ताई तिला हिम्मत देतात आणि धुळीच्या एलर्जीने तिला बरं वाटत नसल्याचं भाऊजींना सांगायला सांगतात. आता मालिकेच्या पुढील भागात आर्या अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात नवसंकट म्हणून कशी येणार?, मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल.