शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अप्पीच्या कारचा मोठा अपघात, संकटाची आधीच होती चाहुल, अर्जुन-अमोलचं पुढे काय होणार?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 17, 2025 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
appi amchi collector serial update appi accident new promo

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अप्पीच्या गाडीचा मोठा अपघात, नवीन प्रोमो व्हायरल

Appi Amchi Collector : झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी माझी कलेक्टर’ या मालिकेला अमोलच्या आजारपणामुळे एक वेगळच वळण आलं आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अमोलच्या हट्टापायी अर्जुन व अप्पी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आनंदी वातावरण होते. अमोलच्या आजारपणाचे संकट असतानाच आता अप्पी-अर्जुन यांच्या आयुष्यात एक आणखी नवीन संकट येणार आहे. अप्पी-अर्जुनच्या आयुष्यातील संकटे काही कमी होत नाहीयेत. एकामागून एक संकटे त्यांच्या आयुष्यात येत आहेत. अशातच आता नवीन संकट येणार आहे आणि या नवीन संकटाचा प्रोमोही नुकताच शेअर करण्यात आला आहे. झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. (Appi Amchi Collector Serial Update)

या नवीन प्रोमोमध्ये अप्पीच्या दारावर जोगतीन जोगवा मागायला येते. तेव्हा अप्पी तिला जोगवा देत असताना “कुलदैवतेला कधी पूजलं होतंस?” असं विचारते. यावर अर्जुनचा भाऊ “बरेच दिवस झाले” असं त्या जोगतीनीला म्हणतो. यावर जोगतीन त्यांना या घरावर संकट येणार असल्याचा इशारा देते. पुढे एका पूजेनिमित्त गुरुजी अर्जुनला पूजेला कोण बसणार आहेत असं विचारताना दिसत आहेत. त्यानंतर अर्जुन मी आणि माझी मंडळी असं उत्तर देते. त्यावर ते गुरुजी त्याला “मुहूर्त गेला तर अपशकुन होईल” असं म्हणतात. त्यावर अर्जुन त्यांना “लवकरच ते येतील” असं म्हणतात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’च्या नव्या मुक्ताबाबत पहिल्यांदाच बोलली अपूर्वा नेमळेकर, दोघींची झाली मैत्री, म्हणाली, “नवीन अध्याय…”

पुढे अप्पी गाडीतून प्रवास करताना वाटेत एक मुलगा आडवा येतो. तेव्हा  अप्पी चालकाला गाडी डावीकडे घेण्यास सांगते. तेव्हा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि ती गाडी एका खोल दरीत जाऊन कोसळते. तसंच हे अपघात होताना अप्पीचा घाबरलेला चेहरा या नवीन प्रोमोमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा अपघात नक्की अप्पीचा झाला आहे का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. “अप्पी अर्जुनच्या कुटुंबावर ओढवणार नवं संकट…” असं म्हणत हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – अक्षरा घरी परतल्यानंतर भुवनेश्वरीचा पुन्हा तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न, सूनेने चांगलेच सुनावले खडेबोल, अधिपती काय निर्णय घेणार?

दरम्यान, मालिकेत जीजी या पात्राची एन्ट्री झालेल्या पाहायला मिळाली आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने अप्पी व अर्जुन यांचा बदला घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता हा बदला घेण्यासाठी त्याने हा डाव खेळला असेल का? या अपघाताचा अप्पीशी काही संबंध असेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.   

Tags: Appi Amchi CollectorAppi Amchi Collector Marathi SerialAppi Amchi Collector Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ankita Walawalkar News

"तुम्हाला कौतुकच नाही", नवी कार घेऊन गावी जाताच आईला असं का बोलली अंकिता वालावलकर?, गोड व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.