Ankita Walawalkar News : प्रेक्षकांची लाडकी रील स्टार म्हणजेच कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. सोशल मीडियावर अंकिता बर्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येत अंकिताने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता ‘बिग बॉस’ नंतरही अंकिता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अंकिता वालावलकरची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अंकिता व कुणाल भगत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या अपडेटनुसार अंकिता व कुणाल त्यांच्या प्रिवेंडिंग शूटसाठी कोकणात गेले आहेत. त्यांनी थेट कोकणातून याबाबतची अपडेट दिली आहे.
लग्नाची गडबड असतानाच अंकिताने आणखी एक गुडन्यूज दिली. अंकिता व कुणाल यांनी त्यांची नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. नवीन गाडीबरोबरचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत याबाबतची माहिती दिली. ‘आवडी आली’, असं कॅप्शन देत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. काही दिवसांपूर्वीच तिने आपली पहिली कार विकली होती. ही कार विकल्यावर अंकिताने महागडी नवी कोरी कार खरेदी केली आहे.
आणखी वाचा – घरात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर कसे वागतात सैफ अली खान-करीना कपूर खान, तैमूरच्या नानीनेच केला खुलासा
अंकिता ही मूळची कोकणातील आहे. नवी गाडी घेतल्यानंतर अंकिता तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर कोकणात पोहोचली. त्यावेळी तिला तिची नवी गाडी कोकणात स्थायिक असणाऱ्या तिच्या आई-वडिलांना दाखवायची होती. लेकीने घेतलेली महागडी गाडी पाहून अंकिताच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया नेमकी काय होती याबाबत अंकिताने स्वतःच माहिती दिली आहे. अंकिताने तिच्या आई-बरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या आईला नव्या गाडीबाबत विचारत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमधून असं स्पष्ट होत आहे की, अंकिता तिच्या गावी सकाळी पोहोचली आणि अगदी रात्रीपर्यंत तिची आई लेकीने घेतलेली गाडी पाहायला गेली नाही, त्यामुळे अंकिता तिच्या आईला जाब विचारताना दिसत आहे. शिवाय दिवस रात्र तू आलेल्या गेस्टचा पाहुणचार करतेस स्वतःसाठी वेळ काढतेस की नाही याबाबतही विचारणा करते. आणि बाबांनीही गाडी नीट न पाहिल्याची तक्रार करते. यावेळी तिची आईही कामाच्या गडबडीत राहील असं सांगत अंकिताची समजून काढते. आणि रात्री काम आटपून अंकिताची गाडी बघायला जाणार असल्याचं कबूल करते.