Appi Amchi Collector New Promo : ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने तब्बल सात वर्षांचा लीप घेतला. तेव्हापासून मालिकेच्या कथानकात मोठा बदल घडवून आणला. प्रेक्षकांनाही ही मालिका आवडली असल्याचे पाहायला मिळालं. सात वर्षांपूर्वी अर्जुन व अप्पी यांच्यामध्ये आलेला दुरावा अखेर मिटणार का याकडे आता साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. अर्जुनच्या आयुष्यात अमोल आल्यानंतर दोघांच्याही आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळालेली पाहायला मिळाली.
अप्पी अमोलला घेऊन सात वर्षांनी तब्बल पुण्यात आली. त्यांनतर पहिल्यांदा अमोलची अर्जुनबरोबर भेट झाली. तेव्हा सगळेच कुटुंब खूप खुश होतं मात्र अमोलने अप्पी व अर्जुन एकत्र रहावे असा अट्टाहासच धरला. अमोलने अर्जुनला त्याच्याबरोबर राहायला भाग पाडलं असलं तरी अर्जुनने मनापासून अप्पीला माफ केलेलं नव्हतं. केवळ अमोलच्या सुखासाठी दोघेही एकत्र राहत होते. तर इकडे आर्या बरोबर अर्जुनचा साखरपुडाही झालेला असतो.
आर्याला दिलेलं वचनही त्याला मोडता येण्यासारखं नव्हतं मात्र अमोल पेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही आहे असा विचार करुन तो त्यांच्याबरोबर राहत असतो. अशातच नुकत्याच समोर आलेल्या मालिकेच्या प्रोमोमध्ये अर्जुन व अप्पी एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळत असून याने मालिकेची उत्सुकता वाढून राहिली. अर्जुन आर्या व अप्पी यांमध्ये कोणाबरोबर राहायचं याचा निर्णय घेण्यासाठी काही वेळ घेतलेला असतो. अखेर अर्जुनने याबाबतचा निर्णय घेतलेला पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Video : अरबाज-निक्कीचा मराठमोळ्या गाण्यावर Bigg Boss Marathi च्या घरात भन्नाट डान्स, उलचून घेत किस केलं अन्…
आर्या की अप्पी निर्णयाचं काय उत्तर द्यावं हे अर्जुनला कळत नसतं. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “अर्जुन अप्पीजवळ येतो आणि तिचा हात हातात घेत अप्पीला म्हणतो, “अप्पी माझा निर्णय झाला आहे”. यावर अप्पी विचारते, “कसला निर्णय”. यावर अर्जुन म्हणतो, “अप्पी मला तुझ्याबरोबर आणि अमोल बरोबर राहायचं आहे”. तर एकीकडे रुपाली असं बोलताना दिसत आहे की, “काही झालं तर अप्पी व अर्जुन भावोजी एकत्र आले नाही पाहिजेत”. अशा पद्धतीने अखेर अर्जुन व अप्पी एकत्र येणार असल्याचा समोर आला आहे. तर यामध्ये आर्या व रुपाली कोणता अडथळात राहणार नाहीत ना?, हे पाहणं रंजक ठरेल.