Bigg Boss Marathi 5 Update :‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाची सुरुवात अगदी धमाकेदार झाली असून हा शो प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. ‘बिग बॉस’ हा शो सुरु होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत. प्रत्येक दिवशी या घरात काहीना काही टास्क असतंच. ज्यातून प्रेक्षकांचे भरभररुन मनोरंजन होत असतं. टास्क, ट्विस्ट, राडे, भांडण, वाद याबरोबरच ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांचे जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. याचे व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांचा धमाकेदार डान्स पाहायला मिळणार आहे. दोघं दादा कोंडके यांचं लोकप्रिय गाणं ‘हिल हिल पोरी हिला’ या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स परफॉरमन्स करणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
यासाठी ‘हिल हिल पोरी हिला’ गाण्यासाठी निक्कीने खास कोळी लूक केला आहे. हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचं ब्लाउज अशा कोळी लूकमध्ये निक्की डान्स करताना दिसणार आहे. तर अरबाजने पांढऱ्या रंगाचा कुर्ता व त्यावर पायजमा असा लूक केला आहे. निक्की व अरबाजच्या डान्स व्हिडीओमधून दोघांची चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांचा हा परफॉर्मन्स घरातील इतर स्पर्धकही चांगलंच एन्जॉय करताना दिसत आहेत.
निक्की तांबोळी व अरबाज पटेल व्यतिरिक्त योगिता चव्हाण, निखिल दामले, अंकिता प्रभू वालावलकर, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, इरिना यांचा देखील जबरदस्त डान्स पाहायला मिळणार आहे. तसंच अभिजीत सावंत एक लोकप्रिय गाणं गाताना दिसणार आहे. अभिजीत ‘मंगलाष्टक वन्समोअर’ या चित्रपटातील ‘सर सुखाची श्रावणी’ हे गाणं गाणार आहे. त्याचं हे गाणं गाताना सर्व स्पर्धक मंत्रमुग्ध झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. अरबाज-निक्कीच्या या डान्स व्हिडीओलं प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, या घरात काल कॅप्टन्सीवरुन नॉमिनेश टास्क पार पडला. यावेळी पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, निखिल दामले, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी आणि घनःश्याम दरवडे या स्पर्धकांना बहुमताने नॉमिनेट करण्यात आलं. हे सहा सदस्य आता घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता पुरुषोत्तमदादा पाटीलनंतर कुठला स्पर्धक घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. येत्या आठडव्याच्या शेवटी घरात एलिमिनेशन पार पडणारे आगे