‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून प्रसिद्धी झोतात आलेले लोकप्रिय गायक व गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी आमचं ठरलं तर म्हणत सोशल मीडियावरुन प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यांच्या लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. दोघांनी आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश दोघेही संसारात रमलेले पाहायला मिळाले. त्यांच्या गावाकडच्या घरातील अनेक फोटो, व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअरदेखील केले होते. प्रथमेश हा मूळचा कोकणातील आहे. कोकणातील आरवली येथे प्रथमेशच खूप मोठं कुटुंब आहे. प्रथमेश हा एकत्र कुटुंबात राहणारा मुलगा आहे. नेहमीच प्रथमेश त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो.
आणखी वाचा – Video : अरबाज-निक्कीचा मराठमोळ्या गाण्यावर Bigg Boss Marathi च्या घरात भन्नाट डान्स, उलचून घेत किस केलं अन्…
अशातच प्रथमेश व मुग्धा यांनी नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या ‘अगं आणि अहो’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलताना प्रथमेश व मुग्धा असं यांनी अनेक गप्पा मारल्या. मुग्धाने तिच्या सासरच्या कुटुंबाबरोबर बोलताना असं म्हटलं की, “मी खूप लकी आहे. आता ते आमचं घर आहे. आमचं घर हे खूप मोठं कुटुंब आहे. कोकणातील घरी आमचं हे कुटुंब आहे. घरी प्रथमेशचे आई-बाबा, सख्खा भाऊ आहेत. प्रथमेशला पाच सख्खे काका आहेत. आणि आम्ही एकत्र राहतो तिथे प्रथमेशचे आई-बाबा, भाऊ, सख्खे काका-काकू, त्यांची मुलं, सूना, पुतण्या-पुतणी अशी मोठी फॅमिली आहे”.
पुढे ती म्हणाली, “प्रथमेश अनेक वर्ष एकत्र कुटुंबात राहिला आहे. आणि आता मी पण त्यांच्याबरोबर कधी राहायला मिळेल याची वाट बघत असते. बरेचदा दौरे असल्याने आम्ही लांब असतो पण गावी गेलं की धमाल येते. प्रथमेशची आई नीना काकू, प्रथमेशचे बाबा उमेश काका, प्रथमेशचा भाऊ प्रतीक असं एक छान कुटुंब आहे. आणि एकत्र कुटुंब असल्याने त्यांच्याबरोबर राहण्याची एक वेगळीच गंमत आहे. मी प्रथमेशच्या आई-बाबांना काका-काकू म्हणते. कारण मी अगदी लहानपणापासून त्यांना काका-काकू बोलत आले आहे. आणि हा माझ्या आईला मावशी व माझ्या बाबाला काका म्हणतो. आणि आम्ही तेच ठेवलं आहे. कारण ओघओघांत बोलताना तेच तोंडून येतं”, असं म्हटलं आहे.