छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अप्पी व अर्जुन हे सात वर्षांनी आता पुन्हा एकदा एकत्र येत असल्याचं चित्र दिसत आहे. काही कारणांनी हे दोघे वेगळे झाले होते मात्र आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सिंबामुळे हे अप्पी व अर्जुन एकत्र आले आहेत.
अप्पी अमोलपासून अर्जुनच त्याचा बाबा असल्याचे लपून ठेवते. मात्र अर्जुनच बाबा असल्याचे सत्य आता अमोलला समजलं आहे. शिवाय बाबांच्या घरच्यांची आणि त्याच्या माँची भांडणं झाली असल्याचेही अमोलसमोर आलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही घरांना एकत्र आणण्यासाठी अमोल स्वतः कष्ट घेताना दिसत आहे. मालिकेत नुकताच अर्जुन व आर्याचा साखरपुडा झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे आता अप्पीने अर्जुनविषयीच्या सर्व आशा सोडून दिल्या आहेत.
याचबद्दलचा एक व्हिडीओ झी मराठीच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या बापूंकडे अर्जुनविषयीच्या भावना व्यक्त करते. यावेळी ती बापूना असं म्हणते की, “अप्पी अर्जुनचं आणि माझं नातं म्हणजे पाऊस आणि वाळवंटासारखं झालं आहे. सगळंच विरुद्ध दिशेला. मी आस लावून बसले आज पाऊस पडेल, आज पाऊस पडेल. पण असं काहीच होत नाहीये.”
यापुढे अप्पी अर्जुनकडून आता कसलीच आशा उरली नसल्याचेही म्हणते. यावेळी “आता अर्जुन आणि मी कधीच एकत्र येऊ शकत नाही. अर्जुनने त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. बापू त्याचा साखरपुडा झाला आहे”. असं म्हणते.
दरम्यान, अमोलसह सर्वांना अप्पी-अर्जुन यांनी मागचं सगळं विसरून पुन्हा एकदा एकत्र यावी अशी इच्छा आहे. मात्र आता एकीकडे अर्जुन व आर्या यांचा साखरपुडा झाला आहे तर दुसरीकडे अप्पीलादेखील त्याच्याविषयीची अपेक्षा आता संपत चालली आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र येणार का? अमोल या दोघांना एकत्र आणू शकेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.a