‘कितनी मोहोब्बत है’ या मालिकेतून करण कुंद्रा अधिक प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘तेरे इश्क मी घायल’, ‘दिल ही तो है’ अशा मालिकांमध्ये तो दिसून आला होता. मात्र ‘रोडीज’ या कार्यक्रमामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तो ‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वात दिसून आला होता. या कार्यक्रमात असताना त्याची ओळख तेजस्वी प्रकाश या अभिनेत्रीबरोबर झाली. दोघांमध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या. मात्र आता त्यांच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न उपस्थित राहिले आहेत. (karan kundra relationship)
करण व तेजस्वी यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकतील असेही म्हंटले जात असतानाच दोघांच्या ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. दोघांच्याही ब्रेकअप साठी एक मुलगी जबाबदार असल्याचे समोर आले आहे. दोघांच्या रिलेशनशिपमध्ये करणपेक्षा १८ वर्षांनी लहान असलेल्या मुलीने प्रवेश केला आहे. तसेच यामुळेच दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचा अंदाज सर्वांनी बांधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षाची असणारी अभिनेत्री रीम शेखमुळे करण व तेजस्वी दूर झाले आहेत. रीम व करण हे सध्या ‘तेरे इश्क मे घायल’ या मालिकेमध्ये एकत्रित काम करत आहेत. तसेच रीमदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कमिटेड व्यक्तीबरोबर एकतर्फी प्रेम करत असल्याचे सांगत आहे. तसेच या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान करण व रिम यांच्यामधील जवळीकदेखील वाढताना दिसत आहे. याच कारणामुळे तेजस्वी व करण यांच्यामध्ये दुरावा वाढत आहे. करण व रीमच्या नात्याबद्दलच्या गोष्टी ऐकून आता तेजस्वी नाराज असल्याचेही म्हंटले जात आहे.
दरम्यान एका युजरने रेडिटवर लिहिले आहे की, “ ‘लाफ्टर शेफ’ सुरु होण्याआधी तेजस्वी व करण यांच्यामध्ये सारकाही व्यवस्थित होतं. अचानक सगळं बिघडलं. तेजस्वी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या शोबद्दल ती नेहमी काही ना काही स्टोरी शेअर करत असते. मात्र हा शो सुरु होऊन इतके दिवस झाले तरीही कोणती स्टोरी पोस्ट केली नाही”.
पुढे त्यात लिहिले आहे की, “तेजस्वीने आतापर्यंत फक्त मोटर शोच्या पोस्ट केल्या आहेत. तसेच तेजस्वी स्वतः खाण्याची शौकीन असतानाही तिने हा शो मध्येच सोडला”.रीम व करण यांच्यामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. नेटकऱ्यांना हे रुचलं नाही. करणचं वय ३९ वर्ष असून रीम २१ वर्षाची आहे.