‘स्टुडंट ऑफ द इअर’, ‘में तेरा हिरो’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘कलंक’, ‘भेडिया’, ‘बवाल’, ‘दिलवाले’, ‘जुडवा २’ अशा अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे वरुण धवन. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता नुकताच वडील झाला असून त्याला मुलगी झाली आहे. ३ जून रोजी वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. यानंतर वरुणचे बाबा व बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी ही आनंदाची बातमी दिली.
डेव्हिड धवन यांनी बाळाची भेट घेऊन रुग्णालयातून निघताना नताशाने मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली. वरुण व नताशा यांना मुलगी झाली आहे, असं डेव्हिड धवन यांनी सांगितलं. अशातच आता वरुणचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे, ज्यामध्ये वरुण आपल्या लाडक्या लेकीला घरी घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
वरुणची पत्नी नताशाला नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आपल्या पत्नी व बाळासह वरुण घरी जात असल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये वरुणने लाडक्या लेकीला आपल्या हातात अगदी हळुवारपणे पकडले असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच यावेळी तो लाडक्या लेकीची काळजीही घेतानाचे पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओला वरुण-नताशाच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी वरुण व नताशा यांचे आई-बाबा झाल्याच्या निमित्ताने कमेंट्सद्वारे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
आणखी वाचा – Video : कंगना रणौतला बिनधास्त कानाखाली मारल्यानंतर CISF महिलेने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी आई जेव्हा…”
दरम्यान, २४ जानेवारी २०२१ रोजी वरुण व नताशा लग्नबंधनात अडकले होते. वरुण व नताशा लहानपणापासूनचे मित्र-मैत्रीण आहेत. लग्नाआधी दोघांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २०२१ साली लग्न केलं. आता तीन वर्षांनी दोघे आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचं आगमन झालं आहे.