सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदित्यला दुखापत झाल्यानंतर पारूने रडत सांगितली तिच्या मनातली गोष्ट, अहिल्यादेवींना दामिनी दोघांविषयी भडकवणार, पुढचा निर्णय काय?

Saurabh Moreby Saurabh More
जून 7, 2024 | 4:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paru marathi Serial update

आदित्यला दुखापत झाल्यानंतर पारूने रडत सांगितली तिच्या मनातली गोष्ट, अहिल्यादेवींना दामिनी दोघांविषयी भडकवणार, पुढचा निर्णय काय?

‘पारू’ या मालिकेत सध्या आदित्य व पारू यांच्या लग्नाचं सत्य लपवण्यासाठी खटाटोप सुरु असलेला पाहायला मिळत आहे. एकीकडे आदित्य हे सत्य लपवल्यामुळे दडपणाखाली आहे. तर दुसरीकडे कडे दिशा व दामिनी हे सत्य अहिल्यादेवींसमोर कसं येईल याची वाट पाहत आहेत. अशातच मालिकेच्या कालच्या भागात दिशा पारुला ऐकवते की, “आता तू दिवस मोजायला सुरुवात कर. लवकरच तू या किर्लोस्कर बंगल्यातून बाहेर पडणार आहेस. तू माझ्याशी सुरुवातीला काय वागली आहेस हे मला चांगलंच लक्षात आहे आणि त्याचा मी बदला घेऊनच राहणार असं म्हणते.

अशातच आजच्या भागात दिशा पारूला तिच्या रुममधून जायला सांगते. यानंतर  पारु बाहेर जात असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खाली पडते. तेव्हा ते मंगळसूत्र लपवण्याचा पारू प्रयत्न करते आणि हीच गोष्ट दिशाच्या लक्षात येते. तेव्हा पारू पळत जाते आणि तिच्या मागोमाग दिशाही पळत जाते. पारू पळत पळत स्वयंपाक घरात जाते तितक्यात तिच्यामागे दिशाही येते अनाई ती पारूला तू काहीतरी चोरी केली आहेस म्हणून अशी पळत आहेस असं म्हणते. इतक्यात तिथे दामिनी येते आणि तीदेखील पारूवर चोरीचा आल घेते.  तसेच तिची चौकशीही करते. मात्र तिच्याकडे काहीच मिळत नाही.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : कंगना रणौतला बिनधास्त कानाखाली मारल्यानंतर CISF महिलेने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी आई जेव्हा…”

यादरम्यान दिशापासून गळ्यातील मंगळसूत्र वाचवण्यासाठी पारू ते तोंडात लपवते. यानंतर एकीकडे पारू तिच्या दोंदात लपवलेले मंगळसूत्र काढते, तेवढ्यात तिकडे जिन्यांवरुन उतरताना आदित्यचा तोल जातो आणि तो खाली पडतो. यानंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत होते. आदित्य पडल्याचे कळताच सगळे धावत येतात. त्यानंतर तिथे पारू येते व ती त्याला उचळण्यासाठी अहिल्यादेवींची मदत करते. नंतर पारू आयुर्वेदिक लेप लावल्यामुळे त्यांना बरं वाटेल असं म्हणते. त्यावर दिशा लेपपेक्षा डॉक्टरांना बोलावले पाहिजे असं म्हणते. यावर अहिल्यादेवी पारुला डॉक्टर येईपर्यंत लेप लावण्याचा सल्ला देतात.

आणखी वाचा – Video : बाबा झाल्यानंतर लेकीला पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर घेऊन आला वरुण धवन, रुग्णालयामधून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल

यानंतर पारू मी गळ्यातलं मंगळसूत्र काढल्यामुळे आदित्य पडल्याचे स्वत:शीच  म्हणते. तसेच याबद्दल ती आईच्या  फोटोकडे बघून आदित्यच्या संरक्षणासाठी लोकांपासून वाचवून हे मंगळसूत्र मला गळ्यात घातले पाहिजे असं म्हणते. यानंतर पारू तिने बनवलेला लेप आदित्यच्या पायाला लावते. पुढे दामिनी पारू आदित्यच्या पायाला लेप लावत डोळ्यातून अश्रु गाळत असल्याचे अहिल्यादेवींना सांगते. तसेच ती पारूबद्दल कानही भरते. मात्र अहिल्यादेवी दामिनीचे काहीही ऐकून न घेता तिलाच दम देतात नि तिथून जायला सांगतात.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsParu
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Bado badi song delete

लोकप्रिय 'बदो बदी' गाणं युट्यूबने थेट डिलिटच केलं, १२८ मिलियनपेक्षा होते अधिक व्ह्युज, नेमकं असं का घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.