Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar : यंदा सिनेसृष्टीतील अनेक कलाकार जोड्यांची पहिली दिवाळी होती. पहिल्या दिवाळी सणाला या जोड्यांनी अगदी दणक्यात दिवाळी साजरी केलेली पाहायला मिळाली. पहिल्या पाडव्याचे या कलाकारांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. या दरम्यान यंदाची दिवाळी एका कलाकार जोडीने अगदी दणक्यात साजरी केली ती जोडी म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर. प्रथमेश व क्षितिजाने यंदाची दिवाळी अगदी दणक्यात साजरी केलेली पाहायला मिळाली. प्रथमेशची पत्नीही अभिनयाक्षेत्रात कार्यरत नसली तरी ती मॉडेलिंगद्वारे वा सोशल मीडियावरुन बऱ्यापैकी सक्रिय असते.
दिवाळीच्या सणानिमित्त प्रथमेश-क्षितीजाने एक अत्यंत खास आणि कौतुकास्पद गोष्ट केली आहे. या जोडप्याने आपली लग्नानंतरची पहिली दिवाळी दिव्यांग मुलांबरोबर साजरी करण्याचा निर्णय घेतला. याचे काही खास फोटो प्रथमेशच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर करत सुंदर अशी पोस्ट लिहिली. त्यांचे या सेलिब्रेशनचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं आहे. यंदाच्या त्यांच्या या दिवाळीला प्रथमेश व क्षितिजा क्षितिजाच्या माहेरी श्रीवर्धन येथे गेले.
लक्ष्मी पूजनला क्षितिजाने दारासमोर घातलेल्या रांगोळीचा व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी क्षितिजाने घातलेल्या रांगोळीने साऱ्यांचं लक्ष वेधलं. साडीवर नथ असलेली सुंदर अश्या पैठणीची रांगोळी क्षितिजाने दारासमोर घातली. क्षितिजाने काढलेली ही रांगोळी पाहून तिच्या नवऱ्याने म्हणजेच प्रथमेश परबनेही तिचं कौतुक केलं.
“सेम टू सेम काढली एकदम रांगोळी. अप्रतिम”, असं म्हणत प्रथमेशने क्षितिजाचं कौतुक केलं. शिवाय हा व्हिडीओ स्टोरीला पोस्ट करत, “टॅलेंटेड बायको”, म्हणत बायकोच कौतुक केलं. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रेमाची कबुली दिल्यानंतर तीन वर्षांनी या जोडीने लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अखेर २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली. लग्नानंतरही प्रथमेश व क्षितिजा बरेच चर्चेत राहिलेले दिसले.