शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलांबरोबरच अधिकाधिक वेळ घालवतो विराट कोहली, अनुष्का शर्माने दाखवली झलक, मुलांनाही वडिलांचाच लळा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 5, 2024 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anushka Sharma Shares Glimpse Of Son And Daughter

मुलांबरोबरच अधिकाधिक वेळ घालवतो विराट कोहली, अनुष्का शर्माने दाखवली झलक, मुलांनाही वडिलांचाच लळा

Anushka Sharma Shares Glimpse Of Son And Daughter  : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा व भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे सध्या त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या येण्याने अधिक चर्चेत आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर अनुष्काने तिच्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. २०१७ साली ती भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर लग्नबंधनात अडकली. इटलीमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. घरातील व मित्रमंडळींपैकी मोजक्याच व्यक्ती या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर अनुष्का व विराटने दोन मुलांना जन्म दिला. सध्या दोघेही त्यांच्या मुलांना वेळ देताना दिसत आहेत.

आज विराट कोहलीचा वाढदिवस असून अनुष्काने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चाहत्यांना एक अप्रतिम ट्रीट दिली आहे. अनुष्काने चाहत्यांना पहिल्यांदाच तिच्या मुलाची झलक दाखवली आहे. यावेळी तिने एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये विराट कोहली आपल्या मुलाबरोबर आणि मुलीबरोबर उभा आहे. आज ५ नोव्हेंबरला विराट कोहली त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने हे सुंदर छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

आणखी वाचा – लेक अबरामसाठी शाहरुख खानने खरेदी केली कोट्यवधींची कार, फक्त मोजक्याच व्यक्तींकडे आहे ही गाडी, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

मात्र, हा फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये फक्त हार्ट इमोजी आणि एव्हिलाय शेअर केला आहे. हा नुसता फोटो असून यांत काहीही न बोलता सर्व काही सांगण्यात आलं आहे. या छायाचित्रात मुलांबरोबर वडिलांची मस्ती पाहून दोन्ही कलाकारांचे चाहते आनंदाने उड्या मारत आहेत. या पोस्टवर एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “आम्ही खूप दिवसांपासून याची वाट पाहत होतो”. अनेकांनी विराटला ‘हमारा किंग’ असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – जान्हवी किल्लेकरने दिलेला शब्द पाळला, सूरज चव्हाणच्या गावी साजरी केली भाऊबीज, म्हणाली, “फक्त एक हाक…”

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्न झाले होते. दोघांच्या लग्नाआधी कोणालाच सुगावा लागला नाही आणि इटलीतील टस्कनी येथे झालेल्या या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर आले. या लग्नाला फक्त त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. अनुष्काने ११ जानेवारी २०२१ रोजी एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव तिने वामिका ठेवले. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलगा अकायचा जन्म झाला. अनुष्काने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला आणि गरोदरपणात ती बहुतांश वेळ तिथेच राहिली.

Tags: anushka sharmaanushka sharma and virat kohliAnushka Sharma Shares Glimpse Of Son And Daughter
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar

प्रथमेश परबला बायकोचं कौतुक, सुंदर रांगोळी काढल्यानंतर शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, "माझी बायको…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.