बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुप्रसिद्ध अभिनेत्री विमानतळावरच नवऱ्याचा पडली पाया, लोकांना तेही पाहावेना, ट्रोलही केलं, म्हणाले, “घरीच करायचं इथे…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 8, 2024 | 2:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anupama fame rupali ganguly trolled by netizens for touched her husband feet at mumbai airport video viral on social media

Video : सुप्रसिद्ध अभिनेत्री विमानतळावरच नवऱ्याचा पडली पाया, लोकांना तेही पाहावेना, ट्रोलही केलं, म्हणाले, "घरीच करायचं इथे..."

‘अनुपमा’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली. ‘अनुपमा’ हा ‘आई कुठे काय करते’ या मराठी मालिकेचा हिंदी रिमेक आहे. हिंदी मालिकेत ‘अनुपमा’ची मुख्य व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली गांगुली साकारत असून गेली १५ ते २० वर्ष रुपालीने छोट्या पडद्याद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे साहजिकच अभिनेत्रीची प्रसिद्धी व लोकप्रियता ही अधिकच आहे.

मात्र या वाढत्या लोकप्रियतेमुळे व प्रसिद्धीमुळे सोशल मीडियाच्या या जमान्यात प्रत्येक लोकप्रिय व्यक्ती हे कॅमेऱ्यात टिपली जाते आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीवर चाहत्यांचे व नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष असते. अशातच अभिनेत्री रुपाली गांगुली नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली होती आणि यावेळी तिने केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर तिला नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर रुपालीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ती विमानतळावर आपल्या पतीच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे. विमानतळावर निरोप घेताना रुपाली आधी पतीच्या पायाला स्पर्श करते आणि नंतर तिचा मुलगाही वडिलांच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे. तिच्या या कृतीचे तिच्या अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे, मात्र काहींना अभिनेत्रीची ही कृती आवडलेली नाही. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी रुपलीच्या या व्हायरल व्हिडीओवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – हार्दिक जोशीने कोल्हापूरमध्ये सुरु केला स्वतःचा व्यवसाय, मिसळचाही आनंद लुटता येणार, नेमकं कुठे सुरु केलं आहे हॉटेल?

आणखी वाचा – कोणी कपडे तर कोणी लायटरवरुन बोललं; इन्स्टाग्रामवर लाइव्ह आल्यानंतर नशा करत राहिला आमिर खान, नेटकऱ्यांचाही संताप, नेमकं काय घडलं?

नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली “खरं तर याची काही गरज नाही. नवऱ्याच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेण्याची काहीही गरज नाही. तू तुझ्या आई-वडिलांच्या पायांना स्पर्श कर, तुझ्या पतीच्या पायाला स्पर्श करण्याची काय गरज आहे?, नवऱ्याच्या आशीर्वादाने यश मिळते ही मानसिकता फेकून द्या, तुम्हाला हे सगळं मनापासून करायचं असेल तर त्यांनी घरीच करायला हवं होतं, इथे कॅमेरासमोर नाही”. अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अनुपमा या मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा खूपच मोठा आहे. तसेच रुपालीची लोकप्रियतादेखील तितकीच आहे. मालिकेत सध्या अनुज व अनुपमा हे एकमेकांपासून दूर आहेत आणि वनराज त्यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं दाखवण्यात आले आहे. मात्र काहींनी हा भाग आवडत नसल्याचे म्हटले आहे.

Tags: anupamaAnupama Fame Rupali GangulyAnupama Serial Fame Rupali GangulyBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsSerial Actressअनुपमाअनुपमा फेम रुपाली गांगुलीअनुपमा मालिका फेम रुपाली गांगुलीबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat kohli connection with premanand maharaj
Entertainment

प्रेमानंद महाराजांच्या आशिर्वादामुळे विराट कोहलीला यश, एका भेटीनंतर गणित बदललं अन्…; सोशल मीडियावर तुफान चर्चा

जून 4, 2025 | 2:20 pm
Sshura Khan Baby Bump
Entertainment

अरबाज खान होणार बाबा, पत्नी शुराचा बेबी बंब पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद, काळजीपूर्वक पाऊल टाकतानाही दिसली आणि…

जून 4, 2025 | 1:14 pm
avantika malik on divorce with imran khan
Entertainment

“मी आता मरणार असं वाटत होतं आणि…”, इमरान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितलं घटस्फोटाचं सत्य, हालत अशी की…

जून 4, 2025 | 12:56 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

कॅन्सरमुळे निधन झालेल्या अभिनेत्याच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, सिनेसृष्टीतील जवळच्या मित्राने दिला खांदा, आजारपणातही केली होती आर्थिक मदत

जून 4, 2025 | 12:34 pm
Next Post
Sharad Ponkshe On Daughter

पायलटनंतर फ्लाइट इन्स्ट्रक्टर झाली शरद पोंक्षेंची लेक, वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, "कोणाच्याही मदतीशिवाय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.