Rupali Ganguly Break Silence : सध्या टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या सावत्र मुलीने तिच्यावर अनेक आरोप केले होते. यानंतर अभिनेत्रीनेही अनेक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली. आता रुपाली गांगुलीने या वादावर मौन सोडले आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्मा हिने तिला विषारी व अपमानास्पद म्हटले होते. ईशा ही अश्विन आणि त्याची पहिली पत्नी सपना यांची मुलगी आहे. २००८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अश्विनने २०१३ मध्ये रुपालीशी लग्न केले. ईशाची २०२० सालची पोस्ट व्हायरल झाल्यावर हा वाद सुरु झाला. ज्यामध्ये ईशाने रुपालीवर अनेक आरोप केले होते.
आईशी लग्न केल्यानंतर रुपालीच अश्विनबरोबर अफेअर असल्याचा आरोप ईशाने केला आहे. ईशाने रुपालीवर नियंत्रण व अपमानास्पद असल्याचा आरोप केला असून, अभिनेत्रीने तिला व तिची आई दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असंही म्हटलं. रुपालीने आता ‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत या वादावर मौन सोडले आहे. तिला मुलाखतीत विचारण्यात आले की, “या सर्व गोष्टींचा तिच्यावर काही प्रभाव पडत आहे का?”. यावर रुपाली म्हणाली, “काही परिणाम होत नाही असं मी बोलले तर मलाच खोटं ठरवतील. अर्थात परिणाम होतो. आपण माणसं आहोत आणि आपल्या मागे कोणी आपल्याबद्दल थोडे वाईटही केले तर आपल्याला वाईट वाटते”.
रुपाली पुढे म्हणाली, “जे लोक प्रेम करतात ते प्रेम करत राहतात. चांगले काम करत राहा, आज नाही तर उद्या तुमच्याकडून चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील. वाईट वेळ कधीतरी येते, वाईट गोष्टी घडतात, पण नेहमी चांगल्याचाच विजय होतो”. गेल्या महिन्यात रुपालीने ईशाच्या मानहानीचा खटला जिंकला होता. रुपालीने ईशावर ५० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता.
रुपालीने दाखल केलेल्या खटल्यानंतर ईशा म्हणाली की, “गेल्या २४ वर्षांपासून मी अडकले होते. मला माझ्या बोलण्याने कोणाला दुखी करायचं नव्हतं. पण हे सगळं बोलणं मला गरजेचं होतं. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की स्वतःच्या मुलाला खरं बोलण्याची इतकी मोठी शिक्षा मिळू नये. मी एक तरुण मुलगी आहे पण मी अजूनही माझ्या वडिलांची मुलगी आहे. त्यांनी मला खूप क्रूरपणे उत्तर दिलं आहे. हाच त्यांचा खरा चेहरा आहे”.