मराठी मालिकांचा लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. सुप्रिया यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुप्रिया यांनी मराठी मनोरंजन विश्वात अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारत आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मुख्य नायिका असो की खलनायिका असो किंवा अगदी सहाय्यक भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच काल (८ एप्रिल) रोजी सुप्रिया यांचा वाढदिवस होता.
सुप्रिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या लाखो चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. अंशुमन विचारेनेही सुप्रिया यांना वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज देत त्यांचा वाढदिवस साजरा केला. अंशुमनने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात अंशुमन आपल्या कुटुंबासह सुप्रिया यांच्या घरी जात त्यांना सरप्राईज देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अंशुमनने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंशुमनची बायको सुप्रिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. यानंतर अंशुमन व त्याची पत्नी त्यांना खास गुलाबी रंगाची साडी गिफ्ट म्हणून देतात. यानंतर ते तिघेही केक कापून सुप्रिया यांचा वाढदिवस अगदी थाटात साजरा करतात. यादरम्यान, सुप्रिया यांची अंशुमनची मुलीबरोबरची धमाल मजा मस्तीही पाहायला मिळत आहे. तसेच आजच्या दिवसातला हा पहिला केक असल्याचेही त्या म्हणतात.
दरम्यान, अंशुमनने सुप्रिया पाठारे यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या खास व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी त्यांना या व्हिडीओखाली वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.