शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“किसिंग सीन करताना लाज वाटत नाही कारण…”, स्मिता तांबेचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “इंटिमेट सीन विचित्र किंवा…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 8, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Smita Tambe commented about the intimate and bold scenes in the film see the details

"किसिंग सीन करताना लाज वाटत नाही कारण...", स्मिता तांबेचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "इंटिमेट सीन विचित्र किंवा..."

७२ मैलाचा एक प्रवास करत मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. ‘७२ मैल एक प्रवास’ यासह ‘जोगवा’, ‘देऊळ’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नूर’, ‘पंगा’, ‘जवान’, ‘जोरम’ अशा मराठी-हिंदी चित्रपटांमधून स्मिताने अभिनय करत मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेदेखील मनोरंजन केले आहे. चित्रपटाच्या मोठ्या पडद्याबरोबरच टीव्हीचा पडदाही गाजवला आहे. याचबरोबर वेबविश्वातही विविधांगी भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.

स्मिताने आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. तिची प्रत्येक भूमिका ही समीक्षकांसह प्रेक्षकांनाही विचार करायला लावणारी होती. अभिनेत्री तिच्या अभिनयाने  जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या बिनधास्त व बेधडक वक्तव्यांनीदेखील चर्चेत राहत असते. अशातच नुकतीच तिने ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखातीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या भूमिकांसह अनेक विषयांवर मुक्तपणे संवाद साधला.

यावेळी ती असं म्हणाली की, “आयुष्यात कधीही किसींग सीन करताना मला माहीत आहे मी अजिबात अस्वस्थ नसणार. ‘कँडल मार्च’ चित्रपटात मी निलेश दिवेकरबरोबर माझा इंटीमेट सीन होता आणि तेव्हा सेटवर सगळे थोडे लज्जित झाले होते पण मला अजिबात विचित्र वाटलं नाही. तेव्हा मी निलेशलादेखील सांगितले. असे सीन शूट करताना मला लाज वाटत नाही याचे कारण म्हणजे त्या पात्राचा सरावाचाच तो एक भाग आहे. “

आणखी वाचा – गावात प्रशस्त घर, मोठं अंगण अन्…; शहरापासून ब्रेक घेत गावामध्ये रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, कुटुंबियांबरोबर घालवत आहे एकत्र वेळ

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “ज्याप्रमाणे त्या पात्राची भांडं उचलण्याची विशिष्ट पद्धत असते, पाणी पिण्याची पद्धत असते किंवा उठण्याची, बसण्याची लकब असते. त्याचप्रमाणे हे दृश्यसुद्धा अगदी सहज आहे. त्या चित्रपटातील कथेनुसार जर ते इंटीमेट दृश्य येत असेल तर ते कधीही विचित्र किंवा वल्गर वाटणार नाही.”

आणखी वाचा – “तू माझ्या डोळ्यात अश्रू आणलेस कारण…”, बायकोची मेहनत पाहून गहिरवरला प्रसाद जवादे, म्हणाला, “घर शोधण्यापासून ते सोडतानाचा क्षण…”

दरम्यान, आपल्या नानाविध चित्रपटांमधून कायमच प्रेक्षकांसाठी नवनवीन भूमिका घेऊन येणारी स्मिता तांबे लवकरच कासरा या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. स्मितानेन आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून सशक्त अभिनय केला आहे. त्याच पठडीतील ‘कासरा’ चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका आहे.   

Tags: marathi actressmarathi entertainment newssmita tambe
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
mandira bedi on plastic surgery

मंदिरा बेदीचा अवतारच बदलला, प्लॅस्टिक सर्जरीवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर चांगलंच सुनावलं, म्हणाली, "माझा चेहरा सगळ्या बाजूंनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.