मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध धाटणीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मोठ्या पडद्यावर आतापर्यंत सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, ऐतिहासिक धाटणीचे चित्रपट एकामागोमाग एक येऊन गेले. पण मराठीमध्ये ॲक्शन चित्रपट क्वचित पाहायला मिळत आहे. मात्र आता ही कमी भरून काढण्यासाठी लवकरच तगड्या स्टारकास्टने भरलेला एक नवाकोरा व बिगबजेट मराठी ॲक्शनपट रसिकांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे, तो म्हणजे नवोदित दिग्दर्शक निशांत धापसे दिग्दर्शित ‘अंकुश’. (Ankush Movie New Poster)
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘अंकुश’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत असून चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अशातच चित्रपटाचे आणखी एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवर नवोदित अभिनेता दीपराज घुले व अभिनेत्री केतकी माटेगावकर रोमँटिक अंदाजात आपल्याला पाहायला मिळत असून अंकुश आणि रावीची ही हृदयस्पर्शी प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करून जाणार आहे. या चित्रपटात धमाकेदार ॲक्शनसोबत रोमान्स आणि कौटुंबिक जिव्हाळा यांचा सुरेख संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – “लक्ष्मीकांत खूप आजारी होते तेव्हा…”, आयुष्यभरासाठी एकट्या पडल्या प्रिया बेर्डे, म्हणाल्या, “माणूस गेल्यानंतर फक्त १३ दिवस लोक…”
या बहुचर्चित व बिगबजेट मराठी ॲक्शनपटात नवोदित अभिनेता दीपराज घुले, अभिनेत्री केतकी माटेगावकर, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, नागेश भोसले, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे आदी कलाकार दिसणार आहेत.
हे देखील वाचा – वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही अशोक मामा इतके फिट कसे?, त्याक्षणी व्यायाम करणंही सोडून दिलं अन्…; म्हणालेले, “झिरो फिगर किंवा…”
‘ओमकार फिल्म्स क्रिएशन’ प्रस्तुत ‘अंकुश’ चित्रपटाच्या निर्मिती राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी केली आहे. कथा नामदेव मुरकुटे यांचं, तर संगीत अमितराज आणि चिनार-महेश यांचं आहे. ६ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून हा चित्रपट यशाचे अनेक रेकॉर्डस् मोडणार, हे मात्र नक्की. (ankush movie)