‘बिग बॉस १७’ मध्ये अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांची जोडी अधिक लक्षवेधी ठरली. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून ही जोडी चर्चेत राहिली. दोघांमध्ये होणारे सततचे वाद, भांडण, मारामारी, प्रेम यामुळे ही जोडी चर्चेत राहिली. आणि त्यानंतर अंकिता लोखंडेचे वैयक्तिक आयुष्य थट्टा बनून राहिले. पतीबरोबरच्या भांडणामुळे तिचे वैयक्तिक नाते हे असुरक्षित असल्याचे भासते. दरम्यान, दोघांचे नाते अत्यंत कमकुवत असल्याचंही बोललं जात आहे. (Ankita Lokhande On Divorce)
‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिताची तिच्या नात्यातील अगतिकता तिला खूप महागात पडली. अनेकदा ती विकीबरोबर घटस्फोट घेण्याबाबत बोलली होती. आणि आता घरातून बाहेर पडल्यावर तिने केलेलं हे भाष्य चूक की बरोबर असल्याचं तिला कळलं आहे. अंकिताने घराबाहेर पडल्यानंतर कबूल केलं आहे की, ती अनेकदा चुकीची होती, विशेषत: जेव्हा राष्ट्रीय टेलिव्हिजनवर घटस्फोट घेण्याबद्दल ती रागाने बोलली हे अत्यंत चुकीचे होते.
‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताला ‘बिग बॉस १७’च्या घरात घटस्फोटाबद्दल सतत बोलण्याबद्दल आणि तिचा पती विकी जैनसह वेगळे होण्याबद्दल विचारले असता, अंकिताला तिची ही चूक उमगली असल्याचं म्हणत ती म्हणाली, “वर्षानुवर्षे आम्ही मित्र होतो, त्यानंतर आमचं लग्न झालं. आम्ही फक्त मस्करीत बोलतो आणि ते गांभीर्याने घेतलं जातं. मी समजूतदार नाही आणि मला जास्त समजूतदार व्हायला हवं. जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर असते तेव्हा मी काय बोलते याची जाणीव ठेवायला हवी. मी अजूनही शिकत आहे. जर आमचं नातं तितकं मजबूत नसतं, तर कदाचित आम्ही भांडणही करु शकलो नसतो”.
ती पुढे याच मुलाखतीत म्हणाली, “फरक एवढाच आहे की, आमची भांडणे टीव्हीवर आली, जी इतर सामान्य जोडप्यांच्या बाबतीत घडू शकत नाही. पण या सगळ्यामुळे आमचे नाते अधिक घट्ट झाले आहे. मी कुठे आहे हे समजू शकले. चूक होत होती आणि तो कुठे चुकत होता हे त्याला समजू शकले. आम्ही पूर्वीपेक्षा अधिक जवळ आलो”. अंकिता लोखंडे व विकी जैन यांनी ‘बिग बॉस १७’च्या घरात असताना खूप लोकप्रियता मिळवली. यावेळी मात्र त्यांच्या भांडणामुळे त्यांनी त्यांच्या चाहत्यांना निराश केले.