गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विजय सेतुपतीबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन, दारुच्या पैशांसाठी लेकाने बेदम मारहाण केली अन्…; धक्कादायक प्रकार समोर

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 8, 2024 | 11:43 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kadaisi vivasayi fame south actress kasammals son beats her to death gets arrested in tamilnadu

विजय सेतुपतीबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन, दारुच्या पैशांसाठी लेकाने बेदम मारहाण केली अन्...; धक्कादायक प्रकार समोर

दक्षिण सिनेविश्वातून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्रीला त्यांच्या मुलाने दारूसाठी मारहाण केली असून या मारहाणीत अभिनेत्रीचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अभिनेत्रीचं नाव कसम्मल असून त्यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. कसम्मल यांचा मुलगा पी. नमाकोडी याने त्यांना दारूसाठी मारहाण केली आणि या मारहाणीत त्यांचं राहत्या घरीच निधन झालं आहे. कसम्मल व त्यांचा मुलगा पी. नमाकोडी यांच्यात दारूच्या पैशावरून भांडण सुरू झाले. मुलाने केलेल्या मारहाणीत अभिनेत्रीचा ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता जागीच मृत्यू झाला.

‘न्यूज 18’च्या वृत्तानुसार, कसम्माला मारण्यासाठी त्यांच्या मुलाने लाकडी दांड्याचा वापर केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मदुराई शहरातील उसिलमपट्टीजवळील अनैयुरमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर, उसिलमपट्टी तालुका पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या खुनाच्या शस्त्रासह नमाकोडीला अटक करून पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अभिनेत्री कसम्मल व त्यांचा पती बालासमी यांना एकूण चार मुले आहेत.

आणखी वाचा – “पूर्वीपेक्षा अधिक…”, अखेर पतीबरोबर घटस्फोट घेण्याबाबत अंकिता लोखंडे स्पष्टच बोलली, म्हणाली, “आमचं नातं…”

कसम्मल यांचा मुलगा गेल्या १५ वर्षांपासून आपल्या पत्नीपासून विभक्त होऊन अभिनेत्री कसम्मल यांच्याबरोबर राहत होता. या काळात त्याला दारूचे व्यसन लागले. दारूच्या व्यसनामुळे त्याने आईकडे वारंवार पैशाची मागणी सुरू केली. त्यादिवशीही नामकोडीने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने आईला मारहाण केली आणि या मारहाणीत अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला.

आणखी वाचा – वाडा, तिथेच मंदिर अन्…; स्वत:च्या मूळ गावी पोहोचला संकर्षण कऱ्हाडे, अंबेजोगाईचं दर्शनही घेतलं, म्हणाला, “घरच्या मारुतीच्या…”

दरम्यान, त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. कसम्मल २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या तामिळ चित्रपट ‘कदैसी विवसयी’ मध्ये दिसल्या होत्या. एम. मणिकंदानी दिग्दर्शित या चित्रपटात नलांदी, विजय सेतुपती व योगी बाबू प्रमुख भूमिकेत होते. कसम्मलने यांनी या चित्रपटात सेतुपतीच्या आईची भूमिका साकारली होती.

Tags: कसम्मलकदैसी विवसयी फेम अभिनेत्रीदाक्षिणात्य अभिनेत्रीदु:खद निधनदुख:द बातमीKadaisi vivasayi Fame ActressKasammalSad DeathSad Newssouth actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Krushna Abhishek And Govinda

गोविंदाच्या भाचीचं ठरलं लग्न, भांडणं असूनही कृष्णा अभिषेक मामाला देणार पत्रिका, म्हणाला, "मतभेद असले तरीही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.