अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. मराठी मनोरंजन विश्वात तर स्वप्नीलला चॉकलेट बॉय म्हणून ओळखतात. सोशल मीडियावरील त्याचा वावर हा त्याच्या चाहत्यांनाही हवाहवासा वाटतो. त्याच्या चाहत्यांसाठी तो नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. स्वप्नीलने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत होता, मात्र त्याने तिथूनही काढता पाय घेतलाय. आता स्वप्नील सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय. मालिकेच्या शूटिंगमध्ये स्वप्नील व्यस्त असला तरी तो सोशल मीडियावरून त्याच म्हणणं चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असतो. त्याचे चाहतेही स्वप्नीलच्या पोस्टची वाट पाहत असतात. (swapnil joshi troll)
बरेचदा स्वप्नील जोशीच्या फॅन्सकडून त्याची शाहरुख खानसह तुलना केलेली पाहायला मिळाली आहे. अशातच स्वप्नीलने शाहरुख खानच्या पाऊलावर पाऊल ठेवून सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुखच्या #AskSRK प्रमाणे स्वप्नीलने सुद्धा #AskSJ असा हॅशटॅग पोस्ट केला होता. यावर चाहत्यांनी स्वप्नीलला अनेक प्रश्न विचारले व त्यानेही या प्रश्नांची परखड व प्रामाणिक उत्तर देत प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. यातील एका प्रश्नावर स्वप्नीलने आपल्या मनातील खंत चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
#AskSJ हॅशटॅगवर एका चाहतीने स्वप्नीलला विचारले की, मराठी मनोरंजन सृष्टीत अशी एक कुठली (Actor or Actress) आहे ज्याच्यासह काम करायची तुझी इच्छा आहे पण अजून योग आला नाही ? यावर स्वप्नील म्हणाला की, मला स्मिता पाटील यांच्या बरोबर एक फ्रेम तरी शेअर करायला मिळायला हवी होती ! ती सल कायम राहिल माझ्या मनात! कारण दुर्दैवाने या योग आता कधीच येणार नाही.
नक्की काय आहे प्रकरण (swapnil joshi troll)
दरम्यान, या सत्रात स्वप्नीलने तू तेव्हा तशी मालिकेवरून टोमणे मारणाऱ्या व टीका करणाऱ्या अनेकांना चांगलेच बोल लावलेत, स्वप्नीलला चांगल्या मालिका करत जा असा सल्ला देणाऱ्या एका युजरला उत्तर देताना त्याने चांगलं काय हे कोण ठरवणार! असा उलट प्रश्न त्या युजरला केला. त्यावर कमेंट करत चाहत्याने प्रेक्षक ठरवतील पण एक चांगला अभिनेता म्हणून तुला अशा मालिकेत पाहायला आवडत नाही”, असं म्हटलं आहे. यावर स्वप्निलने ‘नोंद घेतलीय’ अशी कमेंट केली आहे.
====
हे देखील वाचा- ऋता आणि प्रतीकचा नवीन प्रोजेक्ट?
=====
दरम्यान स्वप्नील जोशी ‘वाळवी’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत राहिला. त्याच्या भूमिकेचेही सर्वत्र कौतुक करण्यात आले. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली. (swapnil joshi troll)